नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.

 नाशिक :- कोरोनाला गत दीड वर्षापासून जवळून अनुभवणारे पोलीस आजही तितक्याच संयमाने,धैर्याने सुनसान रस्त्यावर ड्युटी बजावत आहेत. आपला एक एक सहकारी बाधित आढळून येत असतानाही पोलीस कर्मचाऱ्यांचे मन विचलित झाले नाही. जनतेवर आलेले संकट रस्त्यावर उभे राहून छातीवर झेलत आहेत.


 गतवर्षी महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावली ती पोलिसांनी. कोरोनाच्या रूपाने आलेले संकट निधड्या छातीवर पेलण्यासाठी पोलीस सज्ज झाले.जनता घरामध्ये सुरक्षित असताना पोलीस मात्र सुनसान रस्त्यावर ड्युटी बजावू लागले. लढाईत जसा एकेक मावळा धारातीर्थी पडत होता,तसे पोलीस दलातील कर्मचारीही कोरोनाच्या विषाणूमुळे धारातीर्थी पडत होते,तर अनेकजण कोरोनाबाधित आढळून येत होते.तरीसुद्धा पोलिसांनी आपले कर्तव्य अत्यंत उत्कृष्टरीत्या पार पाडले.अशाच एकदा चांदोरी ता निफाड येथील कु.गार्गी सागर आहेर या चिमुकली ने चांदोरी गावात गस्तीवर असलेल्या पोलीस बांधवांना गुलाबाचे फुल देत ऋण व्यक्त केले होते.तो फोटो आपल्या महाराष्ट्र पोलीस वर्दीतला माणूस या पेज वर ही झळकला.ती आठवण तसेच सध्या मास्क वापरण्या संदर्भात चिमुकल्या गार्गीने सोशल मीडियावर केलेले आवाहन बघत नाशिक चे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सचिन पाटील सर(IPS) यांनी चांदोरी येथे भेट चिमुकल्या गार्गी चे भेट घेत कौतुक केले.या प्रसंगी गार्गीचे कुटूंबीय,सायखेडा येथील पोलीस निरीक्षक श्री आशिष अडसूळ आदी उपस्थित होते.



Popular posts
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image
ठाणे नौपाडा येथील मुख्य भाजी मार्केटचे तलावपाळीला विकेंद्रीकरण. गर्दी टाळण्यासाठी महापालिकेचा निर्णय; प्रत्येक भाजीविक्रेत्यांची अँटीजेन चाचणी.
Image