खाजगी कंपन्यानी आपल्या कामगार वर्गाची RTPCR टेस्ट स्वतः च खाजगी प्रयोगशाळा येथून करावी - : ठाणेकर.

 ठाणे :- जगातील कोरोना संकट उभे असतांना कोरोना दुसरी लाट उसळली आहे.भारतात व विशेषतः महाराष्ट्रात त्याच्या कहर वेगाने वाढत आहे.राज्य शासन प्रामाणिकपणे कामही करीत आहेत,एकीकडे वाढता कोरोना संसर्ग व दुसरीकडे मर्यादित प्रमाणात लसीकरण त्यामुळं आपल्या आरोग्य सेवेवर मोठा दबाव व परिश्रमाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना संकटात पहिल्या दिवसापासून राज्यातील व ठाणे मनपा व ठामपा आरोग्य अधिकारी व कर्मचारी जीव धोक्यात घालून सर्वसामान्य नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी दिवसरात्र कार्यरत आहेत पण काही शासन निर्णयामुळे कमी असणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्गावर अतिरिक्त कामा चा ताण पडतांना दिसत आहे.मुख्यमंत्री उध्ववजी ठाकरे यांनी सदर गंभीर परिस्थिती हाताळताना जनतेचे जीव व आरोग्य सेवा पुरवत असतांना आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ नये म्हणून कामगार वर्गाला आपल्या नोकरीला जाण्यासाठी सूट दिली पण त्यात कोरोना चाचणी (RTPCR)अनिवार्य केली आहे त्यामुळे कामगार वर्ग सर्व या चाचणी दाखला घेण्यासाठी सर्व आरोग्य केंद्रात मोठी गर्दी करीत आहेत यामुळे कोरोना रुग्ण चाचणी व लसीकरण यांच्या वर मोठा परिणाम होत आहे.याबाबत खाजगी कंपन्यानी आपल्या स्तरावर RTPCR टेस्ट किंवा अँटीजम टेस्ट घेणे,कोरोना शिबीर लावणे व दाखले मिळविल्यास मनपा आरोग्य सेवेवरील ताण कमी होऊन लसीकरण वेगाने होण्यास मदत होईल. RTPCR टेस्ट करिता मर्यादित तपासण्या संख्या असल्याने शेकडो कामगार दाखले मिळण्यासाठी गर्दी करतात त्यांना समजावून सांगणे परिणामी काही ठिकाणी वादालाही आरोग्य अधिकारी/ कर्मचारी यांना जावे लागते त्यात मोठा वेळ वाया जात असल्याचे दिसून येते तरी शासनाने सदर विषयाची दखल घेऊन RTPCR टेस्ट व्यतिरिक्त अँटीजम टेस्ट ला मान्यता देऊन आरोग्य सेवे वरी ताण कमी होऊन कोरोना विरोधात लढाईला वेग वाढवता येऊ शकतो व सर्वसामान्य लोकांना कोरोना संसर्ग विषय आरोग्य सेवा तत्परतेने पुरवता येईल असं म्हटलं जातं आहे


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image