राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा घेतला आढावा. राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाकडून लसींचा अधिकाधिक पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना.
महाराष्ट्राला सुमारे एक कोटी सहा लाख डोसेसे प्राप्त. राज्यात दररोज ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण. ८२ लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर. ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची महाराष्ट्राची राज्य सरासरी १२.३ टक्के - मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची माहिती