ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी शहापूर तालुक्याचा केला दौरा.

 ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी शहापूर तालुक्याचा केला दौरा.

तालुक्यातील कोविड परिस्थितीसह विकास कामांचा घेतला आढावा.


ठाणे -: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी आज शहापूर तालुक्याचा दौरा करून तालुक्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतानाच नियमित विकास कामांच्यास्थळी भेट देऊन कामांचा आढावा घेतला.




डॉ.सातपुते यांनी वाशिंद प्राथमिक आरोग्य केंद्र भेट देऊन  कोविड प्रतिबंधक लसीकरणाची स्थिती जाणून घेतली. यावेळी वैदयकीय अधिकारी डा. देवळालकर  यांचे दैनंदिन लसीकरण लक्षांक पुर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर या ठिकाणच्या कोविड प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करताना लसीकरण पुर्ण होण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचे निर्देशही दिले. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत सारमाळ प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करतानाच येथील सोसायटीच्या  सचिवांना खबरदारीच्या बाबत आवश्यक निर्देश दिले. त्यानंतर ग्रामपंचायत वाफे कार्यालय भेट देऊन कामांची तपासणी केली. याचबरोबर ग्रामीण विकास विभागा अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या डेमो हाऊसची पाहणी देखील केली. तसेच जनसुविधा ,तिर्थक्षेञ विकास कार्यक्रम कांमाची पाहणी करताना गावात लसीकरणावर भर देण्याचे सांगत प्रतिबंधक उपाययोजनाचा आढावा घेतला. तसेच वाफे स्मशानभूमि सुशोभीकरण व वृक्षलागवड करण्याबाबत निर्देश दिले.

गोठेघर येथे १०० बेडचे उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटरची पाहणी केली. पाहणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी शहापूर पंचायत समिती कार्यालयास भेट देऊन पाणी टंचाई आणि बांधकाम विकास कामांचा  सखोल आढावा घेतला. 

यावेळी उप सभापती जगन पष्टे, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, गट विकास अधिकारी अशोक भवारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तरुळता धानके, डाँ.शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी श्री.क्षीरसागर, हिरामण खाडे, बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image