छ.शिवाजी महाराज चौक, कळवा येथील शिवस्मारकाचा आज ४१वा वर्धापन दिवस..शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा.

 




तत्कालीन शिवसैनिक(जेष्ठ शिवसैनिक) यांचे मनस्वी आभार*

ठाणे :-  आज रोजी  ४१ वर्षेपुर्वी सदर शिवपुतळ्याचे वं.शिवसेनाप्रमुखांचे शुभहस्ते उदघाटन झाले .तो कळवेकरांसाठी सोन्याचा दिवस होता .कारण त्यावेळच्या शिवसैनिकांचे चिकाटीमुळेच सदरचा पुतळा बसविला गेला .सदर पुतळा शिवसेनाप्रमुखांचे मार्गदर्शनाखाली व तत्कालीन शिवसैनिकांचे देखरेखीखाली बसविण्यात आला. त्यावेळच्या शिवसैनिक व शिवप्रेमिंचे अहत्प्रयत्नाने व शिवसेनाप्रमुखांचे  आर्शिवादाने सदर  पुतळा बसविला गेला .अन्यथा आज जी कळवा चौकाची   *छ.शिवाजी महाराज चौक*   ही ओळख आहे ती अस्तित्वात आली नसती. त्या करिता शिवप्रभूनां मानाचा मुजरा.शिवसेनाप्रमुखांना वंदन व तत्कालीन शिवसैनिकांचे आभार..सदर शिवस्मारकाचा सुवर्णमहोत्सव  भव्यदिव्य व थाटामाटात साजरा व्हावा ही शिवप्रभुंकडे प्रार्थना  👏...तत्कालीन शिवसेनानेते, शिवसेना पदाधिकारी, मुर्तीकार, शिवसेनिक व शिवप्रेमी आणि इतर मान्यवरांचे आभार ..शिवप्रभूंचा पुतळा जिद्दीने कळवा चौकात उभारुन छ.शिवाजी महाराजांचे नावे वेगळी ओळख  निर्माण करणाऱ्या तत्कालीन सर्व  *शिवसैनिकांचे आभार* विजय देसाई यांनी व्यक्त केले आहे