No Means No', मैत्रिणीने प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारावा यासाठी मदत मागणाऱ्या तरुणाला अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्त यांचं उत्तर.

  #LetsTalkCPPuneCity गेल्या काही दिवसांपासून  शहरात राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात.

पुणे : मैत्रिणीने प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारावा यासाठी एका व्यक्तीने ट्विटरवर चक्क पुण्याच्या पोलिस आयुक्तांकडे मदत मागितली आहे. विशेष म्हणजे नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या पुणे पोलीस आयुक्तांनी हा प्रश्नही टाळला नाही. त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना, No Means No सांगत मुलीच्या इच्छेविरोधात काहीच होऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता #LetsTalkCPPuneCity मोहिमेअंतर्गत ट्विटरवर नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. या वेळी एका तरुणाने चक्क आयुक्तांकडे मुलीने प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारावा यासाठी मदत मागितली. गुप्ता आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, दुर्दैवाने मुलीच्या इच्छेविरोधात आम्हीदेखील काही मदत करु शकत नाही. तिच्या इच्छेविरोधात तू देखील काही करु नये. जर एखाद्या दिवशी तिने होकार देण्याची तयारी दाखवली  तर तुला आमच्याकडून शुभेच्छा आहेत. नाहीचा अर्थ नाही होतो. अमिताभ गुप्ता यांनी या वेळी #NoMeansNo हा हॅशटॅग देखील वापरला आहे.


पुणे पोलिस #LetsTalkCPPuneCity गेल्या काही दिवसांपासून  शहरात राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच नागरिकांच्या पोलिसांकडून काय अपेक्षा आहे, हे देखील समजून घेत आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image