यंदाचा शिवजयंती उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे ठाणे महापौर व आयुक्तांचे आवाहन

 ठाणे -: कोविड -१ ९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार ३१ मार्च , २०२१ रोजी येणारा " छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ .विपिन शर्मा यांनी केले आहे.


      याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आली असून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील महापालिका प्रशासनाने केले आहे.यामध्ये शिवजयंती दिवशी अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड / किल्ल्यांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात . परंतु यावर्षी कोविड -१ ९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठया प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

     

     दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी पोवाडे , व्याख्यान , गाणे , नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये . त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी . तसेच  जयंतीनिमित्त  प्रभात फेरी , बाईक रॅली , मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात  आली आहे . 

    

      शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम / शिबीरे ( उदा.रक्तदान ) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना , मलेरिया , डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क , सॅनिटायझरचा वापर करावा. 

 शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम , २००५ मधील कलम ५१ ते ६० , साथरोग नियंत्रण अधिनियम , १८ ९ ७ व भारतीय दंड संहिता , १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय / कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. 




Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image