ठाणे :-: ठाणे महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत पाणी बिलाच्या देयकाची रक्कम भरणा न केल्यास १ एप्रिल पासुन मोठया प्रमाणावर नळ संयोजने खंडीत कारवाई करण्यात येणार असल्याचा ईशारा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिला आहे.
महानगरपालिकेच्यावतीने सन 2020-21 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणी देयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम सुरू आहे. मालमत्ता आणि पाणी कर वसुलीकरिता प्रभाग समितीनिहाय दैनंदिन उद्दिष्ठे देण्यात आली आहेत.
या आर्थिक वर्षातील पाणी देयकांची तसेच मागील थकबाकी 31 मार्च 2021 अखेर न भरल्यास 1 एप्रिल नळ संयोजन खंडित करण्यात येणार असून नागरिकांनी वेळेत पाणी देयके भरून सहकार्य करण्याचे आवाहन देखील महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.