ठाणे :- ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी वाहतुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या कळवा खाडीवरील नवीन पुलाचे काम प्रगतिपथावर असून या पुलावरील 100 मी. मुख्य स्पॅन उद्या दिनांक 11 मार्च 2021 रोजी दुपारी 3 वाजता बसविण्यात येणार आहे.
ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी तसेच ठाणे शहरामधून नवी मुंबई , कोकण , पुणे इकडे ठाणे बेलापूर मार्ग जाण्यासाठी ठाणे आणि कळवा दरम्यान खाडीवर सुमारे शंभर वर्षापूर्वीचा ब्रिटीशकालीन पूल अस्तित्वात आहे. सदरचा पूल कमकुवत झाल्यामुळे माहे सप्टेंबर २०१० पासून वाहतूकीस बंद करण्यास आला आहे. त्यामुळे या ठिकाणी सन १ ९९ ५ - ९ ६ च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या पूलाचा सध्या वापर सुरु आहे. तसेच ठाणे कळवा दरम्यान वाहतूकीच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे व एकच पूल सध्या वापरात येत असल्यामुळे या भागात व पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतुकीच्या सोयीसाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने या नवीन पूल बांधण्यात येत आहे.
दिनांक ११ मार्च २०२१ रोजी दुपारी 3 वाजता या पुलाच्या खाडीवरील भागाचे १०० मी. स्पॅन बसविण्याचे प्रस्तावित आहे. सदर स्पॅनचे हा १०० मी. लांबीचा बास्केट हँडल आकाराचा असून वजन ९५० मेट्रीक टन आहे. लॉचींग करिता बसविण्यात आलेले तात्पुरत्या आधाराचे वजन १०० मे.टन आहे. सदर स्पॅन फॅब्रीकेशनचे काम में.पी.एस.एल.कंपनी , दमण येथे झालेले असून याकरिता वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारचे असलेले टेन्शन रॉड हे परदेशातुन आयात केलेले आहेत. त्यानुसार पहिल्या टण्यामध्ये एकूण ११०० मे टन वजनाचा सांगाडा ( स्पॅन ) जमीन पातळी पासून १४ मी उंच पर्यंत उचलण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये हा स्पॅन १०८ मी जमीनीला समांतर सरकवून खाडीमध्ये उभारण्यात आलेल्या पिअर्स वर ठेवण्यात येणार आहे. दुसरा टप्पा ७ दिवसांनंतर सुरु करण्याचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
यामध्ये कळवा खाडीवरील पुलाची लांबी ३०० मीटर असून त्यापैकी १०० मीटर मुख्य लांबीचा बास्केट हेडल आकाराचा स्पॅन बांधण्यात येणार आहे. या पूलावर क्रिक रस्ता व जेल कोर्ट नाक्यावरील वाहने चढणे करीता सरळ मार्ग राहणार आहे. तसेच साकेत काडून येणा - या वाहनांकरीता वर्तुळाकार रॅम्प बांधण्यात येणार असून ठाणे बेलापूर रस्त्यावर जाणेकरीता थेट मार्ग करण्यात येणार आहे.
तसेच पादचाऱ्यांकरीता स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्यात येणार असून पुलाचे विद्युतीकरण , कळवा पूलाकडील दोन्ही जंक्शन व साकेत राबोडी येथे जाणा - या रस्त्यावरील जंक्शनमध्ये सुधारणा , सुशोभिकरण इ . बाबींचा सुध्दा या प्रकल्पांत समावेश आहे. यामध्ये एकूण २.४० किलोमीटर पूलाचे बांधकाम होणार असून आजमितीपर्यंत ७७ % काम पूर्ण झाले आहे.