ठाण्यात एकूण ४२२१ कोविड बेडस्; महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज.

 ठाणे :-  कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होवू नये यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून महापालिका क्षेत्रात 4221 कोविड बेडसची क्षमता निर्माण करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिली आहे. 


      सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी पालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सुचनेनुसार शहरात योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. यासंदर्भात महापौर नरेश गणपत म्हस्के, पालिकेचे सर्व पदाधिकारी आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात 4221 कोविड बेडस् उपलब्ध करण्यात आले आहेत.

      

       यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे कोवीड हॅास्पीटलमध्ये 1075 बेडस्, विराज हॉस्पिटलमध्ये 30 बेडस्, स्वयंम हॉस्पिटलमध्ये 30, ठाणे हेल्थ केअरमध्ये 53, मेट्रो पोल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल एलएलपीमध्ये 60, टायटन हॉस्पिटलमध्ये 60, कौशल्या मेडिकलमध्ये 100, वेदांत हॉस्पिटलमध्ये 125, सफायर हॉस्पिटलमध्ये (खारेगाव) 142, बेथनी हॉस्पिटलमध्ये 190, हाईलँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 50, एकता हॉस्पिटलमध्ये 25 , विराज हॉस्पिटलमध्ये 30 , कैझेन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 50, वेदांत मल्टीस्पॅसिटी हॉस्पिटलअँड रिसर्च सेंटर येथे 45, वेदांत एक्सटेंशन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर-85 , हॉरिझन प्राइम हॉस्पिटलमध्ये 100, ठाणे नोबल हॉस्पिटल एलएलपीमध्ये 30, ज्युपिटर हॅास्पीटलजवळील पार्किंग प्लाझा येथे 1181, आणि लोढा भायंदरपाडा येथे (टीएमसी)- 760 बेडस् असे एकूण 4221 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.



Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image