ठाणे :- जागतिक पातळीवर निर्माण झालेले कोरोना संसर्गाची संकट गेले वर्षभर सर्वसामान्य जनतेला भेडसावत असतांना कोरोना संसर्गा संदर्भात कोणताही उपचार नसतांनाही फक्त शासन नियम पाळणे हाच उपाय/ पर्याय उपलब्ध होता. गर्दी करू नये,नियमशिस्तबद्ध रीत्या पाळावेत या साठी शासनाने काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना आदेशानुसार आपली चोक कामगिरी पोलिसांनी बजावली व बेशिस्त नागरिकांना शिस्तीचे पालन करण्यास भाग पाडले व लाखो नागरिकांचं जीव वाचले तसेच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात यश आले, संसर्गाचा प्रसार रोखण्यास पोलिसांनी मोठी कामगिरी बजावत असतांना अनेक पोलीस शहीद झाले.
सदर कर्तव्य बजावत असतांना स्वतः ठाणे पोलीस आयुक्त विवेक फनसळकर हे कोरोना बाधित झाले पण पोलीस आयुक्त यांनी कोरोना वर मात करत तत्काळ कर्तव्यास हजर होऊन ठाणे पोलिसांचं मनोबल वाढविले.आता कोरोना ससर्गावर लसीकरण उपलब्ध झाले असून ठाणे मनपा आयोजित कळवा प्रभाग समिती अंतर्गत लसी देण्याचे आरोग्य शिबिर जेष्ठ नगरसेविका अपर्णा साळवी,डॉ खुशबू तावरी,डॉ श्वेता धायगुडे, डॉ हर्षला पाटील यांनी व आरोग्य सेवक यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाचे उदघाटन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फनसळकर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमा चे उत्तम आयोजन पाहून आयुक्तांनी सर्वांचे कौतुक करून लसीकरना बाबत कोणतीही भीती न बाळगता,लसीबाबत खोट्या चर्चेला बळी न पडता सदर ची लस बिनदिक्कत घावी असं आवाहन ही केलं.पोलीस आयुक्त यांचा सोबत कळवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरेकर यांच्या सह एकूण ३० पोलीस कर्मचारी यांनी कोरोना लसी चा डोस देण्यात आला.