ठाणे -: प्लास्टीक बंदी संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये सुमारे ३८० किलो प्लास्टिक जप्त करून रु.१ लाख ७४ हजार दंड वसूल करण्यात आला.
महाराष्ट्र अविघटनशील कचरा ( नियंत्रण ) कायदा २००६ अंतर्गत महाराष्ट्र शासनद्वारे प्लास्टीक व थर्माकोल इत्यादीपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तुंचे ( उत्पादन , वापर , विक्री , वाहतुक , हाताळणी साठवणुक ) वर बंदी घालण्यात आली आहे. तथापि ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदर बंदी मोडून प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे.
सदर मोहिमेतंर्गत महानगरपालिका क्षेत्रात एकूण ४१४ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या त्यापैकी ७१ आस्थापना दोषी आढळून आल्या असून त्यांच्याकडून एकूण रु .१,७४,००० / - दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ३८० किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त (२ ) संजय हेरवाडे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांचे नियंत्रणाखाली सहाय्यक आयुक्त संतोष वझरकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक दिपक अहिरे, अतिरिक्त मुख्य स्वच्छता निरीक्षक सुनिल तम्मडवार, प्रदुषण नियंत्रण विभागाचे अधिकारी ओम पाडळकर, प्रभागातील स्वच्छता निरीक्षक तसेच प्रदूषण नियंत्रण विभागातील कर्मचारी आदींनी केली