चंद्रपूर :- मौजे बोर्डा दीक्षित, ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर येथील सामाजिक सभागृहाला माजी मुख्यमंत्री तथा भटके विमुक्त समाजाचे भूषण असलेले स्व. मारोतराव कन्नमवार यांचे नाव देण्यात आले होते. 10 जानेवारी 2021 रोजी सदर सभागृहाला नाव दिले होते, मात्र काही विकृत समाज कंटकांकडून ते नाव पुसण्यात आले आहे,माजी मुख्यमंत्री स्व. मा. सा. कन्नमवार हे महाराष्ट्रातील द्वितीय तथा भटक्या विमुक्त समाजातील प्रथम मुख्यमंत्री असल्याने केवळ जातीयवादी द्वेषापोटी काही जातीयवादी समाजकंटकांनी सदरचे नाव पुसून पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावला आहे. सदर घटनेचा तातडीने तपास करून संबंधीत दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी केली आहे.
पोंभुर्णा, चंद्रपूर येथील माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे सभागृहाला असलेले नाव पुसून अवमान केल्याप्रकरणी तातडीने दोषींवर कारवाई करा - भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश संयोजक नरेंद्र पवार