ठामपाची ५ बार व १ वाईन शॉपवर धाड. नियम मोडणाऱ्यांवर दुसऱ्या दिवशीही उपायुक्त अशोक बुरपल्ले यांची कडक कारवाई. नियमभंग करणाऱ्या बार चे धाबे दणाणले.

 ठाणे :-  सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध महापालिकेच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई करीत शहरातील ५ बार व १ वाईन शॉप सील केले. महापालिका आयुक्त डॅा.विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


          कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले असून त्या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकाद्वारे धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे.


       या कारवाईतंर्गत वागळे प्रभाग समितीमधील धमाल बार अँन्ड रेस्ट्रॉरंट सहाय्यक आयुक्त विजयकुमार जाधव यांनी सील केला. वर्तकनगर प्रभाग समितीतंर्गत सुरसंगीत बार अँन्ड रेस्ट्रॉरंट, स्वागत बार अँन्ड रेस्ट्रॉरंट आणि नक्षत्र बार अँन्ड रेस्ट्रॉरंट हे तीन बार आणि रेस्टॅारंटस सहाय्यक बाळासाहेब चव्हाण यांनी सील केले. मुंब्रा प्रभाग समिती मधील १ रेस्ट्रॉरंट सहाय्यक आयुक्त सागर सांळुंखे, तर लोकमान्य सावरकर प्रभाग समिती मधील पांडुरंग वाईन शॉप सहाय्य्क आयुक्त कल्पित पिंपळे यांनी सील केले. सदरच्या सर्व कारवाया अतिक्रमण व निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image