राजधानीत संत गाडगे महाराज जयंती साजरी.

 नवी दिल्ली - : क्रातिकारी संत व थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.


 कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


 महाराष्ट्र परिचय केंद्रात संत गाडगे महाराजांना अभिवादन


महाराष्ट्र परिचय केंद्रात संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहीली. यावेळी सामाजकि न्याय व अधिकारीता विभागाचे माजी सहसचिव चंद्रकांत जाधव आणि विधीमंडळाचे माजी जनसंपर्क अधिकारी विठ्ठल जवादे यांच्यासह उपस्थित कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.  


  




Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image