ठाणे :- करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढ होऊ लागल्यामुळे सकाळच्या सञात कळवा परिसरातून मुंबईच्या दिशेकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे .सदरची चिंता सदर प्रवाशांनी बेस्ट कर्मचारी व नागरिकांना सहकार्य करणाऱ्या कळवा खारीगांव परीसरातील शिवसेना पदाधिकारी व्यक्त केली . कळवा चौकातील बसथांब्यावरील नाकाकामगार व वीनाकारण,मास्कन न वापरता फीरणार्यांवर कारवाई करणेची मागणी केली .तसेच खारीगांव चौकातील बसथांब्यावरील अनधीकृत पार्किंग व बसथांब्यांवर नियमित साफसफाई, औषधफवारणीची मागणी केली .त्या अनुसंगाने ठामपा. कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त बोरसे यांना प्रत्यक्ष भेटून शिवसेनेच्या वतीने निवेदन दिले व सर्विस्तर चर्चा केली .शिवसेनेला आश्वासन दिल्यानूसार सकाळी सर्व बस थांब्यावर साफसफाई करणेत आली.व कळवा चौकातील नाका कामगारांना त्यांना नेमून दिलेल्या नीवाराशेड ठीकाणी पाठविविण्यात आले.तसेच प्रत्येक बसथांबा परीसरातील *विनामास्क* फिरणार्यां बहाद्दूरांवर कारवाई करण्याची धमकी देऊन आजचा दिवस सोडण्यात आले.सदर कारवाई करणाऱ्या ठामपाचे पथकाचे विशेषतः स्वच्छता निरीक्षक रणदिवे साहेब व त्यांचे सहकारी यांचे प्रवाशांनी आभार मानले व शिवसेना पदाधीकारी यांनाही धन्यवाद दिले .सदरची बेस्ट कर्मचारी व प्रवासी यांना सहकार्य करण्याची मागील ६/७ महीनेंपासून सूरु असलेली मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार आहे .माझे कुटूंब माझी जबाबदारी .व शिवसंपर्क अभियांन च्या माध्यमातून पालकमंञी एकनाथजी शिंदे साहेब , जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे साहेब व खासदार डाँ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना कळवा-मुंब्रा विधानसभा श्रेञाचे कार्य सुरू आहे अशी माहिती विजय देसाई (सहसंघटक कळवामुंब्रा व सदस्य खासदार रेल्वेप्रवासी समन्वय समिती कळवा) यांनी दिली आहे