ठाणे वर्तक नगर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला आहे.परिसरात भीतीचं वातावरण.

 ठाणे :- ठाणे येथील वर्तक नगर स्थित संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील संजय पुजारी (पुरोहित) यांच्या घराबाहेर असलेली दुचाकी जाळल्याचा प्रकार घडला आहे. तडतड जळण्याचा आवाज ऐकताच घरातील सर्व सदस्य बाहेर आले त्यावेळी दुचाकी जळत असल्याचा प्रकार त्यांनी पहिला व त्याचक्षणी त्यांनी अग्निशमन दलाला घडलेल्या प्रकाराची माहिती देताच अग्निशन दल घटनास्थळी दाखल झालं. आणि आग विझवण्यात आली. अज्ञात व्यक्तीने दुचाकी जाळल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलिसांकडे या घटनेबाबत तक्रार करण्यात आली आहे. दुचाकी जाळण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि हा हिंसक प्रकार करण्यामागे कोण व्यक्ती आहे याचा शोध सुरु आहे.सदर मंदिर परिसरात नश्या करणारे/गर्दुल्ले यांचा वावर वाढला असून पुजारी कुटुंबातील महिलेनं त्यांना मंदिर परिसरात येण्यास मज्जाव केला होता त्याच्या राग गर्दुल्ले मंडळींनी काढला नाहीना असा संशय व्यक्त होत वअसून वर्तक नगर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच ही घटना घडली आहे. ही घटना पहाटे ४ च्या दरम्यान घडली असून  दिवसा ढवळ्या  या ठिकाणी गर्दुल्ले स्वतःच राज्य असल्यासारखं मोकाट फिरत असतात त्यामुळे या क्षेत्रात व पुजारी कुटुंबात असुरक्षिततेचं व भिती च वातावरण पसरलं आहे.



Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image