ठाणे - ज्यांचे स्वतःचे हक्काचे घर नाही अशा नागरिकांना एक खूशखबर आहे . ठाणे , कल्याण परिसरात ७५०० घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे .मार्चमध्ये लॉटरीची प्रक्रिया आणि सोडत मे महिन्यात जाहीर होऊ शकते . येत्या काही दिवसांमध्ये याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे . म्हाडा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे .
ठाण्यात भंडारली आणि गोटेघर येथे तर कल्याणमध्ये शिरढोणे , खोणी येथील म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे . विरारमध्ये पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या घरांची लॉटरी नुकतीच काढण्यात आली . ज्या पोलिसांना घर हवे आहे त्यांनी कोकण म्हाडाशी संपर्क साधावा असं आवाहन आव्हाड यांनी यावेळी केले . पोलीस , चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना घरे उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले आहेत . या सोडतीतील घरं ही ठाणे , कल्याण आणि नवी मुंबईतील आहेत . कोकण मंडळाची सोडत ही लॉकडाऊनमुळे थोडी लांबणीवर गेली होती . मात्र आता तयारी सुरू झाली आहे