ठाणे :- सोमवार दि. १फेब्रुवारी २०२१ रोजी पासून काही ठराविक वेळेत सर्वसामान्य प्रवाशांना लोकल रेल्वे मधून प्रवास करण्याची सवलत *मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेसाहेब व त्यांचे मंञीमंडळाने* जाहिर केला .सुमारे दहा महिन्यांचे कालावधी नंतर सामान्यांना प्रवास करण्याची परवानगी मिळाल्यांने *सामान्य जनतेने* सदर निर्णयाचे मनापासून स्वागत केले .काही प्रमाणात का असेना थोडाफार दिलासा मिळाल्याने सर्वांनी सरकार व रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत .नागरिकांनी पहिल्या लोकलनेच प्रवास करुन राज्य सरकार व रेल्वेचे आभार मानले असल्याचे कळवा रेल्वे स्थानक तिकिट खिडकीवरील बुकिंग क्लार्क ने सांगितले .शिवसेना कळवा शाखा व खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समिती कळवा यांनी कळवा रेल्वे स्थानक येथील स्थानक प्रबंधक व त्यांचे सर्व तिकिट खिडकी वरील सहकारी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना धन्यवाद दिलेत.तसेच पहिल्या दिवसीच तिकिट खिडकी वरील रांगा व गर्दी पाहून अजूनही तिकिट खिडकी वाढविण्याची प्रबंधकाना सुचना केली ती त्यांनी त्वरीत मान्य केली . कळवा पूर्वेला फलाट क्रमांक दोन वर कल्याण दिशेला दोन पाळीमधे व मुंबई दिशेकडील खिडकी एक पाळीमधे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे . शिवसेने व्यतीरिक्त कोकण रेल्वे प्रवासी संघ, कळवा प्रवासी संघ, कळवा महिला प्रवासी संघ,इत्यादींच्या पदाधिकारी यांनी कळवा रेल्वे स्थानकात हजर राहून सदर निर्णयाचे स्वागत केले .काही व्यापारी संघटना , किरकोळ व घाऊक विक्रेता संघटना व नागरिकांनी सदर निर्णयाचे स्वागत केले आहे .सदर निर्णयाचे स्वागत करणे साठी कळवा रेल्वे स्थानकावर शिवसेना कळवा शाखा,खासदार समिती , प्रवासी व व्यापारी संघटनांचे प्रतीनीधी व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते असं विजय देसाई (शिवसेना कळवा-मुंब्रा विधानसभा सहसंघटक व खासदार समिती सदस्य कळवा) यांनी म्हटलं आहे