घरफोडी करून मोबाईल व रोख रक्कम चोरणाऱ्या चोरांना श्रीनगर पोलिसांनी केली अटक*

 ठाणे :- दि. ३०/०१/२०२१ रोजी सी पी तलाव वागळे इस्टेट येथील मोबाईलच्या  दुकानाचे शटर तोडून मोबाईल चोरणाऱ्या व मेडिकलच्या  दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम चोरून  नेणाऱ्या तिन आरोपींना ठाणे श्रीनगर पोलिसांनी मोठ्या शीताफीने अटक केली आहे.


         सुनील शत्रुघ्न निशाद वय 26 वर्ष या इसमाच वागळे इस्टेट येथे मोबाईलचे दुकान आहे,29 तारखेला रात्री 10 च्या दरम्यान दुकानाचे शटर तोडून रिपेरिंग करिता आलेले 17 मोबाईल व दोन डिस्प्ले असा एकूण 1,05,000/- रुपये किमतीचा माल घरफोडी करून चोरून नेला होता, त्या नंतर सचिन तानाजी सूर्यवंशी यांचे वागळे इस्टेट येथे धन्वंतरी मेडिकल नावाचे दुकान आहे, त्याचे शटर तोडून 2000 रुपये चोरून नेले होते,या बद्दलचे   गुन्हे  30 तारखेला  श्री नगर पोलीस स्टेशन मध्ये नोंदवले  गेले.


        या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील शिंदे, पोलीस उप निरीक्षक कुलकर्णी , पोलीस हवालदार इंगळे, पोलीस हवालदार मोरे, पोलीस नाईक जाधव, पोलीस शिपाई शेडगे यांनी तपासास सुरुवात केली,तपासात  त्यांना गुप्त बातमीदारमार्फत मिळालेल्या माहिती नुसार व तांत्रिक साधनांचा वापर करून आरोपी पवन लालमोहन राम वय 29, संदीप बलवंत  अठवाल वय 26, यांना रामनगर वागळे इस्टेट येथून तर विजय सुरेश डिंग वय 26 वर्ष याला भांडुप टॅंक रोड येथून ताब्यात घेतले, त्यांच्या कडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्या कडून 17 मोबाईल व रोख रक्कम 2000/- रुपये असा 1,,04,00/-रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला, त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी भांडुप येथे अशा स्वरूपाचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे, कमी कालावधी मध्ये घरफोडी सारख्या गुन्ह्यांची उकल करून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे विभागातील व्यापारी तसेच नागरिक यांनी पोलिसांनी केलेल्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.






Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image