गुहागर-कुटगीरी गावच्या परेश आगरे यांची व्यावसायिक क्षेत्रात पाऊल.

 मुंबई :- मी मराठी....!अगदी आपण सर्वच अभिमानाने म्हणतो आज प्रत्येकाला मी मराठी असल्याचा गर्व आहे.असच एक मराठी पाऊल आज व्यावसायिक क्षेत्रात पुढे सरकले आहे.गुहागर तालुक्यातील कुटगीरी गावचे सुपुत्र असणाऱ्या परेश आगरे यांनी नुकतंच प्रति कोकण संबोधल्या जाणाऱ्या दिवा नगरीत स्वतःच "महादेव ऑटो गॅरेज" या नावाने सर्व प्रकारच्या फॉर व्हीलर गाड्यांची काम करणारे हे दुकान आज चक्क या कोकण सुपुत्राने प्रचंड लोकवस्ती असणाऱ्या दिवा येथे सुरू केलं आहे. दिवा आगासन रोडला,बेडेकर नगर येथे त्यांचे हे दुकान आहे.अतिशय गरीब कुटूंबातील हा मुलगा मात्र गाडी चालवणे,ती एक आवड यातून आज स्वतःच तो मेकॅनिकल बनला आहे.प्रत्येकाला अभिमान वाटावा अस हे कुणबी सुपुत्राने केलेली ही वाटचाल अनेकांना प्रेरणादायी आहे.या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईतील पाणबुडी कलामंचाचे शिलेदार शाहिर सचिन धुमक,शाहिर दीपक भुवड, रमेश कोकमकर,प्रशांत पाष्टे, सुरेंद्र मोरे, संतोष मोरे यांनी प्रत्येक्ष त्यांच्या या नव्या दुकानाला भेट देऊन त्यांना पुढील वाटचालीस  पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या. कुटगीरी या खेडे गावातील तरुणाने आज एक यशस्वी पाऊल उद्योगात टाकल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image