शक्ती कायद्यासंदर्भात मुंबईतील महिला व वकील संघटनांकडून महत्वपूर्ण सूचना - गृहमंत्री अनिल देशमुख.


 मुंबई -: शक्ती कायद्यासंदर्भात आज विधानभवन येथे संयुक्त समितीसमोर मुंबईतील विविध महिला संघटना तसेच वकील संघटनांकडून महत्वपूर्ण सूचना व निवेदन प्राप्त झाले असून समितीच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होईल, असे या संदर्भातील समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

            या बैठकीत उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, अपर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे तसेच विधिमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत व इतर सदस्य उपस्थित होते.

            मुंबईतील जवळपास 46 महिला व वकील संघटनांकडून सूचना, निवेदन प्राप्त झाले होते. त्यांच्या प्रतिनिधींनी समितीसमोर सुचना मांडल्या. या समितीची पुढील बैठक औरंगाबाद येथे दि. 30 जानेवारी, 2021 रोजी होणार असून त्याठिकाणी देखील महिला व वकील संघटनांकडून सूचना व निवेदन स्विकारले जाणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image