गरीबांना धान्यवाटपाच्या बहाण्याने दागिने लंबास करणाऱ्या भामट्यास कासारवडवली पोलीसांनी केले जेरबंद.

 ठाणे -: आमदार साहेब हे


गरीबांना धान्य आणि कपडे वाटणार आहेत,त्यामुळे तुम्ही गरीब दिसण्यासाठी तुमच्याजवळ असणारे दागिणे आणि महागडे मोबाईल पिशवीमध्ये लपवून ठेवा अशी आयडीया देवून पिशवीमध्ये ठेवलेले दागिणे घेवून पसार झालेल्या भामट्याला बेड्या ठोकण्यात कासारवडवली पोलीसांना यश आले आहे.या भामट्याला डोंबिवलीतील कटईनाका या परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.


5 जानेवारी रोजी कमला वासुदेव भोईर,(वय -६० वर्षे), ही महिला कासारवडवली विजयपार्क येथे जात असताना दोन अनोळखी मुले त्यांचे जवळ येवुन आमदार साहेब गरिब लोकांना धान्य आणि कपडे वाटप करणार आहेत,तुम्हाला धान्य व कपडे पाहिजे असतील तर तुम्ही गरिब दिसण्यासाठी गळयातील सोन्याची माळ व मोबाईल लपवुन पिशवी मध्ये ठेवा असे सांगुन बोलण्यात गुंतवुन ठेवले.आणि त्यांनी महिलेकडील सोने व इतर मौल्यवान वस्तु असलेली पिशवी चोरी करुन पळुन गेले होते. त्यामुळे आपली पिशवीच चोरी झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.


सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहुन तपासकामी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि/शहादेव पालवे यांचेकडे देण्यात आला.त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री किशोर खैरनार यांना गुप्त बातमीदारामार्फत गुन्यातील आरोपीबाबत बातमी मिळाल्याने त्यांनी तपास पथकास माहिती देवुन त्यांनी केलेल्या मार्गदशाप्रमाणे तपास पथकाने सापळा रचुन आरोपी नामे चंदर लक्ष्मण काळे वय-१९ वर्षे रा-काटईनाका ओम सोसायटी रुम नंबर ५ डोंबिवली यास अतिशय शिफातीने ताब्यात घेवुन त्याचे कडुन गुन्हयात चोरी गेलेला खालील मुददेमाल हस्तगत करुन सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. १) ६०,000/-रुपये किमतीची १२ ग्रॅम वजनाची पिवळया धातुची राजांणु मण्याची माळ ताब्यात घेतला.


 सदरची कारवाई पोलिस आयुक्त ठाणे शहर श्री विवेक फणसाळकर.पोलिस सह आयुक्त सुरेश मेकला,अप्पर पोलिस आयुक्त,पश्चिम प्रादेशीक विभाग श्री अनिल कुभारे,मा.पोलिस परिमंडळ ०५ वागळे इस्टेट विभाग श्री विनय कुमार राठोड,तसेच सहा.पोलिस आयुक्त साो,वर्तकनगर विभाग ,श्री पंकज शिरसाठ,तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री किशोर खैरनार, जयराज,अविनाश काळदाते,वैभव धुमाळ,सपोनि एस.डी.पालवे,सपोनि फड,पोलिस हवालदार कोरे, महेंद्र लिंगाळे,  रावते, रमेश जाधव, गायकवाड, तुषार पाटील, दादासाहेब दोरकर,राजकुमार,सुजित खरात, महापुरे, मनोज महाजन यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास,शहादेव पालवे हे करित आहेत.

Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image