ठाण्यातील औद्योगिक भूखंड व्यवहार प्रकरणी फेरतपासणीचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश.

 मुंबई : औद्योगिक कारणासाठी दिलेल्या भूखंडावर शासनाची परवानगी न घेता, 200 कोटींचा महसूल न भरता बांधकाम केले जाणे ही गंभीर बाब असून यासंदर्भात फेरतपासणी करून सर्वंकष आढावा सादर करावा, अन्यथा यासंदर्भात विधिमंडळाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल, असे विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी सांगितले.

औद्योगिक प्रयोजनार्थ सूट दिलेल्या परंतु नंतर बांधकाम झालेल्या ठाणे येथील जमीन प्रकरणासंदर्भात माजी नगरसेवक, ठाणे म.न.पा. श्री.रामभाऊ तायडे यांच्याकडून प्राप्त झालेल्या निवेदनासंदर्भात विधानभवन, येथे बैठक झाली. या बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर, महसूल व नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


औद्योगिक प्रयोजनार्थ हस्तांतरित केलेल्या मौजे पाचपाखाडी, ता.जि. ठाणे येथील 18165.20 चौ.मि. चा भूखंड परवानगी न घेता विक्री केला गेला. हस्तांतरण, विक्री व्यवहार यासंदर्भात चौकशी करून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी दिले.

Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image