ठाणे परिवहन सेवेच्या मदतीला बेस्ट आली धाऊन

 





ठाणे :- करोना प्रादुर्भावामुळे रेल्वेसेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहे .अशावेळी पर्यायी रस्ते मार्गाने मुंबईच्या दिशेने प्रवास करणे साठी आपल्या टीएमटीच्या मदतीला बेस्ट धाऊन आलेली असून सकाळच्या सञात सकाळी  ६-३० ते १२-०० या वेळेत बेस्ट प्रशासन आत्माराम पाटील चौक रेतीबंदर सर्कल, खारीगांव नाका व छ. शिवाजी महाराज चौक कळवा येथे ग्राऊंड बुकिंग करुन  विनावाहक वातानुकूलीत , साध्या   व  मर्यादित बससेवेच्या  सुमारे दोनसे फेऱ्या सरासरी  *तीन ते चार*  मिनीटांचे अंतराने चालविलेल्या आहेत .त्याकरीता  कळवा चौक,  खारीगांव नाका व रेतीबंदर सर्कल येथे शिवसेना खारिगांव, व कळवा शाखेच्या वतीने  नगरसेवक उमेश पाटील व  कळवा खारिगांव व कळवा पूर्व येथील शिवसेना पदाधीकारी यांनी   बेस्टच्या ग्राऊंड बुकिंक स्टाफच्या अधीकारी व वाहक चालक यांना धन्यवाद दिले  व त्यांना भेडसावणार्या  वाहतूक कोंडी,  बसथांब्यावरील अनधीकृत पार्किंग  इत्यादी समस्यां समजून घेऊन त्यासमस्या सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन नगरसेवक उमेश पाटील यांनी संबंधित बेस्ट कर्मचारी यांना दिले .अशी माहिती सदर बेस्ट बसेस चालक व वाहक यांना नीयमित सहकार्य करणारे  विधानसभा सहसंघटक विजय देसाई , उपविभागप्रमुख अरविंद सैतावडेकर, उपशाखाप्रमुख वैभव शिरोडकर , महादेव दाभोळकर व शिवसैनीक  राजेंद्र दहिबांवकर यांनी माहिती दिली आहे .

सदर भेटीच्या प्रसंगी खारीगांवचे माजी नगरसेवक श्याम पाटील, उपविभागप्रमुख रविंद्र पाटील, शाखाप्रमुख अरविंद काबडी व शेखर सावंत , उपशाखाप्रमुख गुरुदत्त देसाई व जगदिश चौधरी व खारीगांव शाखेतील इतर पदाधीकारी व ज्येष्ठशिवसैनीक उपस्थित होते .

Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image