मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी अथक प्रयत्ना मुळे धुळ्यातील आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे प्राण वाचवले.

 ठाणे  :ठाण्यात उपायुक्त पदी कार्यरत असतांना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर यांनी मुंबई पोलीस उपायुक्त पदीही आपल्या कार्यची छाप पाडत असून फेसबुकवर लाईव्ह येऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धुळ्यातील युवकाचे प्राण आयर्लंडचे फेसबुक अधिकारी आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे वाचले. 23 वर्षीय युवक टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असताना फेसबुक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी संबंधित तरुणाचा जीव वाचवला. यामध्ये मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 


आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक हा धुळे पोलिसातील होमगार्डचा मुलगा असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री संबंधित 23 वर्षीय तरुणाने फेसबुक लाईव्ह सुरु केले. लाईव्ह चालू असतानाच त्याने स्वतःच्या मनगटाची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रविवारी रात्री 8 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हा प्रकार घडताना आयर्लंडमधील फेसबुक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला.



आयर्लंड अधिकाऱ्यांचा रश्मी करंदीकरांना फोन

फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मुंबई पोलीस उपायुक्त (सायबर गुन्हे) रश्मी करंदीकर यांना फोन केला. करंदीकरांनी तातडीने पावलं उचलत धुळे पोलिसांशी संपर्क साधला. विशेष म्हणजे अवघ्या 25 मिनिटात स्थानिक पोलिसांनी या तरुणाचा शोध घेतला आणि त्याच्यापर्यंत पोहोचून प्राण वाचवले.


युवक धुळ्यातील ज्या भागातून फेसबुक लाईव्ह करत होता, त्याचे लोकेशन पोलिसांना मिळाले होते. नाशिकचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर आणि धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस त्याच्या घरापर्यंत पोहोचले होते.


युवकाला रुग्णालयातून डिस्चार्ज

आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या युवकाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सोमवारी त्याला डिस्चार्जही देण्यात आला. आता त्याचं काऊन्सिलिंग केलं जाणार आहे. डीसीपी रश्मी करंदीकर यांनी सर्व तांत्रिक माहिती वेळेत उपलब्ध करुन दिल्याने तात्काळ कारवाई करत त्याचे प्राण वाचवता आले, अशी माहिती पंडित यांनी दिली.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image