एक महिन्यांत सव्वा तीन कोटींचा दंड वसूल. ठाणे वाहतूक पोलिसांकडून ई चलानची विक्रमी दंड वसूली.

 ठाणे :- वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या वाहनचालकांच्या विरोधात ई चलान पद्धतीने ठोठावलेल्या दंडाच्या वसूलीसाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यांत तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघनाच्या ९६,०८२ प्रकरणांमधिल दंड वाहनचालकांनी भरला आहे.  

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी १४ फेब्रुवारीपासून ई चलान बजावण्यास सुरूवात केली होती. १३ डिसेंबर, २०२० पर्यंत सुमारे १० लाख ५० हजार वाहनचालकांना नियमभंग केल्याप्रकरणी ई चलान बजावण्यात आले होते. त्यांची दंडाची रक्कम सुमारे २६ कोटी रुपये आहे. ई चलान असल्याने दंडाची ही रक्कम भरण्यास वाहनचालक टाळाटाळ करत होते. कारवाई होत नसल्याने त्यांची बेदरकारीसुध्दा वाढली होती. वाहनचालकांमध्ये नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढावी यासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ई चलानच्या दंड वसूलीसाठी १ डिसेंबर, २०२० पासून धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत महिन्याभरात ३ कोटी २३ लाख ९४ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. त्यात कार्डच्या माध्यमातून ३९ हजार १६८ प्रकरणांमध्ये १ कोटी ५२ लाख रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे. तर, ५६ हजार ९१६ वाहनचालकांनी रोखीने १ कोटी ७१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. या मोहिमेअंतर्गत होणारी कारवाई यापुढेही सुरू राहणार असून वाहन चालकांनी आपापल्या दंडाची थकीत रक्कम भरावी असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. 

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दित ठाणे वाहतूक पोलिसांचे १८ विभाग कार्यरत आहे. यापैकी नारपोली विभागाने सर्वाधिक ४० लाख ३७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्या खालोखाल कल्याण (२९ लाख १५ हजार) उल्हासनगर (२७ लाख ५९ हजार), कळवा (२६ लाख ५५ हजार) या विभागाचा क्रमांक लागतो.  आपल्या वाहनांनी कुठे, कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे याची सविस्तर माहिती ई चलानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. तिथेच दंडाची रक्कमही दिलेली आहे. ती भऱण्यासाठी चार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असून वाहनचालकांनी त्याचा अवलंब करावा असे आवाहनही बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. 


अशा पद्धतीने भरा ई चलानचा दंड

१. ठाणे शहर वाहतूक विभागाच्या अधिपत्याखाली ५९ अधिकारी आणि अंमलदारांकडे ई चलान मशिन आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही चलानची रक्कम रोख किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून तिथे भरता येते. 

२. www.mahatraffic,gov.in या शासनाच्या वेबसाटवर आपल्या वाहनाचा किंवा चलान क्रमांक नोंदविल्यास प्रलंबित तडजोड शुक्ल दिसून येईल. तिथे चलान क्रमांकाची निवड करून दंडाची रक्कम भरता येते.  

३. पेटीएम अँप मध्ये रिचार्ज आणि बिल पेमेंट या पर्यायांवर क्लिक केल्यानंतर चलान नावाचा टँब दिसतो. तिथे पुन्हा क्लिक केल्यानंतर Traffic Authority अशी विचारणा केली जाते. त्यावर महाराष्ट्र ट्राफिक पोलीस हा पर्याय निवडावा. त्यानंतर वाहन किंवा चलान क्रमांक नोंदवून दंडाची रक्कम भरता येते.   

४. Mahatriffic App,Mum traffic App  मध्ये My Vehicle या टँबवर क्लिक करून आपल्या गाडीचे रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर My E challan मध्ये आपल्या गाडीवर किती तडजोड रक्कम बरायची आबे ते दिसेल. त्यानंतर चलानवर क्लिक करून त्या रकमेचा भरणा करता येईल.

Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image