ठाणे ;- ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू ) पठाण यांनी ठाणे महानगर पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार मावळत्या विरोधी पक्षनेत्या प्रमिलाताई केणी यांच्याकडून आज स्वीकारला.
प्रमिलाताई केणी यांचा कार्यकाळ संपत असल्याने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाने तसेच गृहनिर्माण मंत्री मा. ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली अशरफ शानू पठाण यांची ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असल्याचे शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे यांनी गुरुवारी सायंकाळी जाहीर केले होते.
त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी शानू पठाण यांनी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा गटनेते नजीब मुल्ला, मा. विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रमिलाताई केणी यांच्याकडून विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारला. शानू पठाण यांच्या रुपाने मुंब्रा भागाला प्रथमच विरोधी पक्षनेेतेपद मिळाले असल्याने मुंब्रा भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे पालिका मुख्यालयामध्ये प्रचंड गर्दी केली होती. तर, पदभार स्वीकारल्यानंतर शानू पठाण यांची मुंब्रा भागात मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा- मुंब्रा विधानसभाध्यक्ष तथा परिवहन समिती सदस्य शमीम खान, मुंब्रा येथील नगरसेवक राजन किणे, सिराज डोंगरे,अनिता किणे, अशरिन राऊत, बाबाजी पाटील, श्रीमती हाफ़िजा नाईक, सुनीता सातपुते, रुपाली गोटे, मोरेश्वर किणे, फरज़ाना शेख, हीरा पाटील, रेहान पीतलवाला, इमरान सुरमे, ज़फर नोमानी आदी उपस्थित होते. अवघ्या चार महिन्याच्या कालावधीत प्रमिला ताई यांनी कोरोना काळात ही उल्लेखनीय कामगिरी बजावली,१९ डिसेंबर २०२० रोजी प्रमिलाताई केणी यांनी विरोधी पक्षनेते पद सभाळताच अवघा तीन महिन्यांत कोरोना लोकडाऊन करण्यात आले.कोरोना काळात आपले पती जेष्ठ नगरसेवक मुकुंद शेठ केणी यांच्या सोबत प्रमिलाताई नी स्वतःच्या हाताने जेवण बनवून अत्यावश्यक सेवेतील व गरजू ना रोज अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा केला दुर्दैवाने जेष्ठ नगरसेवक मुकुंद शेठ केणी हे जनसेवा करीत असताना करोना बाधित होऊन जून महिन्यात मुकुंद शेठ यांचं दुःखद निधन झालं. चारीबाजुनी संकट येत असतानाही प्रमिलाताई केणी यांनी आपले मोठे पुत्र मंदार केणी यांच्या सोबत समाज कार्य पुढे सुरू च ठेवले, कोरोना संकट,मुकुंद शेठ केणी यांचं अचानक निधन या संकटात प्रमिला ताई यांना विरोधी पक्षनेते पद अत्यल्प काळच मिळालं,त्याना अजून मुदतवाढ न मिळाल्या मुळे कळवेकरां मध्ये नाराजी व्यक्त होत आहे.