ठाणे :- टोरंट पॉवर लिमिटेडने १ मार्च २०२० पासून शीळ-मुंब्रा-कळवा येथे महावितरणकडून कारभार स्विकारला. महावितरणची फ्रँचायझी असल्याने टॉरंट पॉवर लिमिटेड कंपनी महावितरण / एमईआरसीच्या सर्व मार्गदर्शक सूचनांना बंधनकारक आहे. यामध्ये नियम, दर, सेवा इत्यादींचा समावेश आहे.
ग्राहकांच्या आकलनासाठी हे स्पष्ट केले गेले आहे की वीज युनिटचे दर पहिल्या १०० युनिट्ससाठी कमी दर, त्यानंतरच्या २०० युनिटसाठी वाढलेला दर इ. महाराष्ट्रातील सर्व महावितरण ग्राहकांसाठी एमईआरसीने मंजूर दर असून हे दर शीळ-मुंब्रा-कळवा मधील सर्व ग्राहकांना समान दर लागू आहे.
पुढे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की विद्युत अधिनियम, 2003 आणि सीईएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंपनीने वेळोवेळी मीटरची तपासणी / नवीन आधुनिक मीटर जोडणी केली पाहिजे, जेणेकरुन मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक त्या आधुनिक सुविधा पुरविल्या जाव्यात. म्हणूनच जुन्या मीटरची जागा टोरंट पॉवरच्या नवीन मीटरने घेतली आहे
तथापि, काही लोक अफवा पसरवित आहेत की टॉरेन्ट पावर मीटर वेगात आहेत. परंतु हे समजून घेणे महत्वाचे आहे की टॉरेन्ट पावरने बसवलेले मीटर त्यांच्याद्वारे तयार केले जात नाहीत. महावितरणच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे हे खरेदी केलेले मानक व प्रगत मीटर आहेत. हे जीनस, सिक्योर इत्यादी सुप्रसिद्ध उत्पादकांकडून खरेदी केले गेले आहे, तथापि, जरी एखाद्या ग्राहकाला मीटरबद्दल शंका असेल आणि त्याची चाचणी घ्यायची असेल तर वीज पुरवठा संहिता 2003 आणि विद्युत कायदा 2003 च्या तरतुदीनुसार एमईआरसी हे करण्यास मुक्त आहे.
टॉरेन्ट पावरने आतापर्यंत सुमारे ६००० नवीन मीटर बसविली आहेत आणि बहुतेक ग्राहक नवीन मीटरबाबत समाधानी आहेत.
दुसरे म्हणजे, हे देखील लक्षात घेतले पाहिजे की एमईआरसी पुरवठा कोड 2003 च्या तरतुदीनुसार, ग्राहकांना वीज कंपनीने दिलेला मीटर बसवायचा नसेल तर स्वत: चे मीटर देखील आणू शकतात.
महावितरणने दिलेल्या निर्देशानुसार ग्राहक त्यांच्या आवडीचे मीटर खरेदी करू शकतात. वरील वैशिष्ट्ये टॉरंट पॉवर लिमिटेड ग्राहक सेवा केंद्रात विनंतीवर उपलब्ध आहेत. ग्राहक महावितरणकडून मंजूर पुढीलपैकी कोणत्याही एजन्सीकडून त्यांची मीटर खरेदी करू शकतात. जीनस पॉवर, स्नायडर इलेक्ट्रिक, एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर, एव्हन मीटर, लिंकवेल टेलीसिस्टम इत्यादी.
एकदा ग्राहकाने त्याचे मीटर विकत घेतले की त्याने टॉरंट पॉवर ग्राहक सेवा केंद्राला माहिती दिली पाहिजे. त्यानंतर मीटरची तपासणी ग्राहकांच्या उपस्थितीत मुंब्रा येथील टॉरेन्ट पावर लॅबमध्ये करुन नंतर ग्राहकाच्या आवारात बसविली जाईल.
उपरोक्त माहिती टॉरंट पॉवरने ग्राहकांच्या समजून घेण्यासाठी त्यांच्या जनसंपर्क खात्यातर्फे प्रसारीत करण्यात आली आहे