रस्ते सुरक्षा मोहिमेसाठी लघुपट स्पर्धा. ठाणे वाहतूक पोलिसांचा उपक्रम.

 ठाणे -: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ते अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस कटीबध्द असून रस्तांवरील सुरक्षित प्रवासासाठी धडक कारवाईसह व्यापक जनजागृती मोहिम हाती घेतली जाणार आहे. याच मोहिमेअंतर्गत लघुपट अर्थात शाँर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वयोगटासाठी असलेल्या या स्पर्धेतील सर्वोत्तम तीन शाँर्ट फिल्म्सना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविले जाणार आहे. सात फ्लिम्सना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे उत्तेजनार्थ रोख पारितोषिक देण्यात येईल. तसेच, या सर्व फिल्म्स ठाणे शहर वाहतूक पोलीस शाखेच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेलवर प्रदर्शित केल्या जातील असे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. 


मद्यप्राशन करून वाहन चालविणे, नो पार्किंग झोन मध्ये वाहन उभे करणे, सीट बेल्ट न लावता वाहन चालविणे, वाहन चालवताना फोनवर बोलणे, हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालविणे, सिग्नल मोडणे आणि १८ वर्षांखालील मुलांना वाहन चालविण्यास देणे असे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार सर्वाधिक होतात. नेमक्या याच सात विषयांवर स्पर्धेसाठी शाँर्ट फिल्म सादर करायच्या आहेत. स्पर्धेतील सहभाग पूर्णपणे विनामूल्य आहे. स्पर्धेत वैयक्तिक रित्या किंवा ग्रुपने सहभागी होता येईल.  फिल्मची लांबी २ मिनिटांपेक्षा जास्त नसावी. फिल्मसाठी कोणत्याही भाषेचे बंधन नाही. प्रादेशिक भाषांतील फिल्म्स सबटायटल्स असतील तर उत्तम. फिल्म आडव्या ( horizontal ) स्वरूपात चित्रित केलेली असावी. तसेच फिल्मची व्हिडिओ  आणि ऑडिओ क्वालिटी चांगली असावी. ( video : 720P or 1080P MP4 or MOV Format.). फिल्मच्या कन्सेप्ट आणि पायरसी संदर्भातील सर्व जबाबदारी हि फिल्म बनवणाऱ्यांची राहील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी फिल्म पाठविण्याची अंतिम तारीख २० जानेवारी आहे.


नियमांचे पालन करूनच शुटींग 

शुटिंग करताना वाहतुक नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त असेल. या शुटिंग दरम्यान कुणालाही त्रास होणार नाही ही खबरदारी घ्यावी लागेल. या फिल्म शूट करतांना स्थानिक वाहतूक शाखेची पूर्व परवानगी आवश्यक असून त्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर त्वरीत ही परवानगी दिली जाणार आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरणासाठी आवश्यक परवानगी घेऊनच चित्रीकरण करावे लागेल. 


अशी पाठवा फिल्म

फिल्म्स पाठवताना, खाली दिलेल्या ई-मेल id वर डाउनलोड लिंक किंवा unlisted youtube लिंक पाठवावी तसेच त्यासोबत आपले ( बनवणाऱ्याचे किंवा ग्रुप चे ) पूर्ण नाव व मोबाईल नंबर पाठवावे. जेणेकरून अंतिम निर्णया संदर्भात आपणास कळवता येऊ शकेल. 


फिल्म्स पाठविण्यासाठी ई-मेल id : contest.roadsafety.dcpthane@gmail.com

अधिक माहितीसाठी संपर्क: +91 97730 02349 / +91 86551 51730


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image