नागरिकांसाठी ॲानलाईन सेवा सुरू करा - सेवा हक्क आयोग मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय ठाणे महापालिकेच्यावतीने सेवा हक्क अधिनियम मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन.

 ठाणे :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा कायदा लोकांसाठी असून त्या आधारे नागरिकांना जास्तीत जास्त ॲानलाईन सेवा सुरू कराव्यात अशा सूचना राज्याच्या लोक सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केल्या.


ठाणे महानगरपालिकेच्यावतीने डॅा. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटर येथे आयोजित करण्यात आलेल्या सेवा हक्क अधिनियम मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. या समारंभाला ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर नरेश गणपत म्हस्के, उप महापौर सौ. पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेते अशरफ पठाण, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना श्री. क्षत्रिय यांनी नागरिकांना पारदर्शक आणि कालमर्यादेत सुविधा कशा पद्धतीने देता येतील यासाठी हा कायदा बनविण्यात आला असून अधिकाऱ्यांनी हा कायदा आणि या कायद्यातील नियमावलींचा अभ्यास करावा अशा सूचना दिल्या.


आयोगाचे मुख्य आयुक्त स्वीधीन क्षत्रिय यांनी यावेळी कायद्यातील तरतुदी, त्यातील नियमावली याविषयी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे या कायद्यातंर्गत कोणत्या सेवा ॲानलाईन पद्धतीने देण्यात येणार आहेत याची माहिती नागरिकांना द्यावी व त्या प्रत्येक सेवेसाठी एक पदनिर्देशीत अधिकारी नेमावा अशा सूचना केल्या.


ठाणे शहराचे प्रथम नागरिक महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी या कायद्यातील पारदर्शकता, गतीमानता आणि कालमर्यादा या त्रिसुत्रीविषयी माहिती देवून या कायद्याच्या अंमलबजावणीचे यश अधिकाऱ्यांवर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले.


प्रारंभी महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी प्रास्ताविक करून नजीकच्या काळात लोक सेवा हक्क अधिनियमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगितले.


या कार्यशाळेसाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे, सर्व उप आयुक्त, उपनगर अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यालयीन अधीक्षक आदी सर्व अधिकारी उपस्थित होते.


यावेळी श्री. क्षत्रिय यांनी महापालिका मुख्यालय, वर्तकनगर प्रभाग समितीमधील नागरी सुविधा केंद्र तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समिती नागरी सुविधा केंद्राला भेट देवून तेथील नागरिक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला.









Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image