ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी - कर्मचारी यांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान. कोव्हीड काळात केलेल्या कामगिरीबद्दल गौरव.

 ठाणे - : जगभरात थैमान घालणाऱ्या करोना महामारीवर ठाणे जिल्ह्यात नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने शर्थीने लढा दिला. त्यामुळे करोनाला अटकाव करण्यास जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्याच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात प्रातिनिधिक स्वरूपात आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी कोव्हीड  योद्धयांना सन्मानित करण्यात आले.    


ग्रामीण भागात  करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने अहोरात्र काम केले. आज वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश जाधव ( दाभाड ), डॉ. कुंदन चव्हाण ( टेभा ), डॉ. दत्तात्रय धरणे ( शेणवा ) , आरोग्य सहाय्यिका विजया भोरे ( मांगरुळ ), पूजा मोहपे ( धसई ) आरोग्य सहाय्यक मंगल पवार ( दहागाव ), अमर तायडे ( मुख्यालय ठाणे ), राजन हंडोरे ( खारबाव ), औषध निर्माण अधिकारी  अनिल भडकुंबे ( सरळगाव ) नागमोती पु. के ( वाशिद )  शिवाजी गायकवाड ( धसई ), प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेंद्र सोळंकी ( शिरोशी ) , आरोग्य सेविका संगीता अदाटे, (शिरोशी ) ज्योती देवघरे ( वांगणी )  शैला पाटील ( शेंद्रूण ) , आरोग्य सेवक उमाकांत पाटील ( दाभाड ), निलेश वेखंडे ( वाशिंद ), बाळकृष्ण चंदे ( निळजे ). अमोल दुधाळे ( धसई ) माधुरी कुलकर्णी ( निळजे), सी. एच. ओ डॉ. ज्योत्सना उमरेटकर, कुणाल म्हात्रे ( दाभाड ), राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी वैभव पाटील ( शहापूर ), अजय जाधव ( मुख्यालय ठाणे ), आशा कार्यकर्ती सुरेखा म्हात्रे ( कोन ), अर्चना दवणे ( मंगळूर ), श्रद्धा घरत ( कोन ), संजिवनी वेखंडे ( किन्हवली ) आदी कोविड योद्धांचा सन्मान करण्यात आला अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे यांनी दिली.



Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image