ठाण्याची चैताली सुवारे हिची ऑनलाईन कॅरम चैलेन्ज२०२१स्पर्धेसाठी निवड

 ठाणे  :- १ जानेवारी ते १२ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या इंडियन ओनलाईन कॅरम चॅलेंज स्पर्धा-२०२१ साठी महाराष्ट्रातून ठाण्याची कु. चैताली अनंत सुवारे हिची निवड झाली असून तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.हि निवड महाराष्ट्र कॅरंम असोसिएशनच्यावतीने करण्यात आली.

 इंडियन ओनलाईन कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकूण चार जणांची निवड करण्यात आली.पालघर,रत्नागिरी,मुंबई तर ठाण्यातून कु.चैताली अनंत सुवारे हिची निवड करण्यात आली. सध्या चैताली इयत्ता १२वीत शिकणारी विद्यार्थीनी आहे.लहानपणापासून जिद्द,चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर आजपर्यंत तिने कॅरम स्पर्धेक अनेक पदके मिळवीली आहेत.इयत्ता आठवीत असताना तीने आयईएस टुर्नामेंटमध्ये पहिला नंबर मिळविला होता.तर शाळेय क्रिडा स्पर्धांमधूनही तिने यश संपादन केले आहे.


 चैताली ही ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली या शहरात रहायला असून मुळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आहे.इयत्ता ८ वीत असताना तिला कॅरम स्पर्धेची आवड निर्माण झाली.हि स्पर्धा खेळता खेळता तिने उतुंग भराली घेतली.दि.१ जानेवारी २०२१ रोजीपासून होणाऱ्या इंडियन चॅलेंज स्पर्धेचे महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.या स्पर्धेत विभाग-२ मध्ये भारतातील एकूण निवड झालेले ५२ महिला खेळाडू आहेत.ही स्पर्धा चार लीगमध्ये खेळविली जाणार आहे.यातून खेळला जाणारा खेळाडू कॅरमचा चॅम्पियन बनणार आहे. चैताली हिला या स्पर्धेत सुयश प्राप्त होण्यासाठी प्रशिक्षक श्री विवेक म्हात्रे,श्री प्रदिप साटम,श्री चिंतामण पाटील आदी मार्गदर्शन करीत आहे.


चैताली सुवारे हिच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र कॅरम असोसिएशन,चैतालीचे वडील श्री अनंत सुवारे,आई आश्विनी सुवारे यांनी अभिनंदन केले आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image