दिड कोटीचा गुटखा जप्त. नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची कामगिरी

 नाशिक -: नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सचिन पाटील यांना प्राप्त गुप्त माहितीचे आधारे दि. 16/01/2021 रोजी रात्रीचे सुमारास नाशिक ते सापुतारा महामार्गावर राजस्थान येथुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा व सुगंधी तंबाखु घेवुन दोन कंटनेर नाशिकच्या दिशेने येत असल्याची

खबर मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने करंजखेड फाटा, ता दिंडोरी परिसरात सापळा रचून 02 कंटेनर ताब्यात घेतले. सदर दोन्ही कंटनेरची झडती घेतली असता त्यामध्ये मिराज कंपनीचा 1,24,34,730/- रूपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा सुगंधीत तंबाखुचा साठा मिळुन आला. सदर अवैध साठा घेऊन जाणारे ४ इसम नामे 1) महेंद्रसिंग शंबुसिंहानी सोलंकी, रा. उदयपुर, राजस्थान, 2) शामसिंग चतुरसिंहजी राव, रा. बिदसर, चितोडगड, राजस्थान, 3) अर्जुनसिंग जसवंतसिंग राणावत, रा. चितोडगड, राजस्थान, 4) लोगलजी मेहवाल, रा. उदयपुर, राजस्थान यांना ताब्यात घेवुन त्यांचे कब्जातुन प्रतिबंधीत गुटखा सुगंधीत तंबाखुचा साठा व दोन कंटनेर वाहन असा एकुण 1,64,34,730/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर बाबत वणी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार पुढील तपास करीत आहे.




Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image