ठाणे :- करोना प्रादुर्भावामुळे सर्व सामान्ययांसाठी रेल्वेसेवा बंद असल्याने बेस्ट , टीएमटी, एसटी,इत्यादी परिवहन सेवेच्या बसेस मधून कळवेकर नागरिक दररोज मुंबईला कामानीमित्ताने ये-जा करीत आहेत .बेस्टने कळवा विभागातून मुंबईला बसेस सोडलेल्या आहेत .शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे बसेसच्या बर्याच फेऱ्या वाढविण्यात आलेल्या आहेत . सदर मुलुंड आगारच्या वातानूकुलीत वीनावाहक बसेना आत्माराम पाटील चौक(रेतीबंदर सर्कल), खारीगांव नाका व छ.शिवाजी महाराज चौक(कळवा नाका) येथे वाहक ग्राऊंडबुकिंग करुन प्रवाशांना रांगेत बसमधे प्रवेश देतात.आधी तिकिट देणे नंतर बसमधे प्रवेश देणे वाहकांना ञासाचे जात होते .प्रवाशांची भांडणे व वाहकांची होणारी तारांबळ पाहून *शिवसेना कळवा शाखेने* मुलुंड व घाटकोपर बेस्ट आगारातील अधिकाऱ्यांशी संपर्क करुन सर्व बेस्ट कर्मचाऱ्यांना कळवे परीसरात सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन आणखी बसेसच्या फेऱ्या वाढविण्याची विनंती केली .त्यानूसार कळवेपरीसरांतून बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत .आणि बेस्ट प्रशासनाला आश्वासन दिल्याप्रमाणे मागील *सहा महीने* सकाळी ६-३० ते ११-३० या वेळेत कळवा खारीगांव , घोलाईदेवीनगर, आतकोनैश्वर नगर , भास्करनगर , न्यु शिवाजी महाराज नगर , आनंदनगर पुर्व व विटावा शाखेतील पदाधीकारी रेतीबंदर चौक, खारीगांव नाका व छ.शिवाजी महाराज चौक कळवा येथे बेस्ट कर्मचाऱ्यांना सहकार्य व प्रवाशांना मार्गदर्शन करीत आहेत . सदर ठीकाणची वाहतूक कोंडी, अनधीकृत पार्किंग हटविणे, बेस्ट वाहकांशी हूज्जत घालणारे रिक्षाचालक यांना समजावून सांगणे, वाहतूक पोलीसांचे नीयमांचे पालन करणे तसेच कळवा चौकातील घोळकाकरुन मास्क वगैरे न वापरता हुल्डडबाजी व दादागिरीची भाषा करणाऱ्या *शेकडो नाका कामगारा बांधवांना* समजावून बाजूला हटविणे इत्यादी कामे करावी लागतात .कळवा चौकात रिक्षा पार्किंग व वाहतूक कोंडी आणि खारीगांव नाका येथे !अनधीकृत वाहन पार्किंग या महत्त्वाच्या समस्यां आहेत . सदर बाबतीत वाहतूक पोलिस यांचे संपर्कात राहून समस्यांचा नीपटारा केला जात आहे . येत्या काही दिवसांत रेल्वे सुरू झाल्यावर सदरची बससेवा सुरूच ठेवण्याची विनंती बेस्ट प्रशासनाकडे करणेसाठी आज दुपारी विजय देसाई , अरविंद सैतावडेकर, रोहन शिंदे व वैभव शिरोडकर हे मुलुंड आगारमधे गेलो असता तेथे बेस्ट कामगार सेना अध्यक्ष व बेस्ट समिती सदस्य मा.सुहास सामंत यांचे मार्गदर्शनाखाली बैठक सुरू होती .मुलुंड आगार बेस्ट सेनेचे युनीट सचीव अफजल शेख यांनी आम्हांला सदर बैठकीत सन्मानाने बसविले व आपल्या शाखेने मागील सहा महिन्यात जे बेस्ट ला सहकार्य केले त्याचा उल्लेख करून प्रातीनीधीक स्वरूपात कळवा शाखेचा सत्कार केला .तो विजय देसाई यांनी स्विकारला. व यापुढेही बससेवा सुरूच ठेवावी कळवा परिसरातील शाखांचे आपणांस असेच सहकार्य राहील याचे आश्वासन दिल्याचे विजय देसाई यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा सहसंघटक व सदस्य खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समिती कळवा शिवसेना कळवा मुंब्रा विधानसभेच्या वतीने म्हटलं आहे.