ठाणे :- जागतिक कोरोना काळात राज्यातील नागरीकांचे जीव वाचविण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा वाढदिवस ठाणे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल येथे नेत्र विभागाने मोतीबिंदू ची मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून साजरा केला.कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांच्या हस्ते झाले तर नेत्र तज्ञ डॉ प्रसन्न देशमुख व डॉ शुभांगी अंबाडेकर हे उपस्थित होते.ठाणे जिल्हा संघटना अध्यक्ष दीपक भानुशाली व सरचिटणीस विठ्ठल बढे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सदर नेत्र मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला असे प्रशासना कडून सांगण्यात आले आहे.डॉ.अंबाडेकर मॅडम यांनी
आज नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी रित्या केल्या आहेत.