Big Breaking.ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या परिश्रमाला यश. कोविड लसीचा पहिला साठा ठाणे जिल्ह्यात दाखल.

 ठाणे :- कोविड १९ आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचा पहिला साठा आज पहाटे ४.३० वा. जिल्ह्यात  दाखल झाला आहे.दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणास प्रारंभ होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.  


विशेष वाहनाने ही लस ठाणे येथे  आणण्यात आली. उपसंचालक कार्यालय मुंबई मंडळ ठाणे येथे  हा साठा पोहोचविण्यात आला आहे.


पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून ठाणे मंडळासाठी  सुमारे १ लाख ३ हजार डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  यापैकी ठाणे जिल्ह्यासाठी ७४ हजार डोस   उपलब्ध झाले आहेत. या ठिकाणाहून  ठाणे जिल्ह्याती


ल २९ निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. उपसंचालक डॉ गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे हे लसिकरण मोहिमेचे पुढील नियोजन करीत आहेत.

Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image