खर्डी येथे उभा राहणार सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना. कृषि-पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे यांच्या हस्ते नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन.

 ठाणे - शहापूर तालुक्यातील खर्डी येथे ठाणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत पशुवैद्यकीय सेवासुविधा युक्त  पशुवैद्यकीय दवाखाना ( श्रेणी १ ) उभा राहत असून या दवाखान्याच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन कृषि-पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील तीन महिन्यात सुसज्ज  , वैद्यकीय सोयीसुविधा असणारी इमारत उभी राहील असा विश्वास श्री.निमसे यांनी व्यक्त केला.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या पशुवैद्यकीय दवाखान्यातर्गत विविध सेवा देण्यात येणार आहेत. यामध्ये प्राण्यांची आरोग्य तपासणी, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, विविध नमुने तपासणी, औषधोपचार, खच्चीकरण, वंध्यत्व तपासणी, शत्रक्रिया, गर्भ तपासणी,  लसीकरण आदी सेवा उपलब्ध असणार आहेत.  

खर्डी परिसरात पशुधन आणि पशुपालकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे याठिकाणी सुसज्ज पशू दवाखान्याची गरज व्यक्त केली जात होती. या दवाखान्यामुळे पशूधनाच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. 


या भूमिपूजन कार्यक्रमाला  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.लक्ष्मण पवार, उद्योजक अरुण शेलार , पशुधन विकास अधिकारी डॉ.आश्विनी पावरा, डॉ.दर्शन दळवी, डॉ.संपद भोसले, डॉ.अक्षया घोडके, करण , सेवक विशे, उपस्थित होते.

Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image