ठाणे जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेचे कर्मचाऱ्यांना प्रबोधन व मार्गदर्शन करणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांच्या हस्ते प्रकाशन.

 ठाणे -:  कार्यालयीन प्रशासकीय कामकाजा संदर्भात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना प्रबोधन व मार्गदर्शन करणारी  २०२१ सालाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सभागृहात हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.


यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, कृषि-पशु व दुग्धशाला समिती सभापती संजय निमसे, महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमाळे, समाज कल्याण समिती सभापती नंदा उघडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते , मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुभाष भोर,उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) अजिंक्य पवार, तसेच सर्व स्थायी समिती सदस्य व सर्व खातेप्रमुख  अधिकारी , कर्मचारी  उपस्थित होते. 


या दिनदर्शिकेतून महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, गटविमा योजना वर्गणी, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती दर स्थानिक पूरक भत्ता, वाहतूक दर, व्यवसायकर, सन अप्रीम, आयकर दर २०१९ - २०  प्रशासकीय लेखन. टिपणीलेखन, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ सभा कामकाज , सेवा पुस्तक आद्यायावत ठेवणे ( महाराष्ट्र नागरी ( सेवेच्या शर्ती )१९८१) , सेवा नियम महत्वाच्या तरतूदी ( महाराष्ट्र नागरी सेवा ( रजा ) नियम १९८१),  मत्ता दायित्व, सेवा जेष्ठता यादी, गोपनीय अहवाल , पदोन्नतीसाठी आवश्यक बाबी, अभिलेख वर्गीकरण, बिंदू नामावली करावयाची कार्यवाही , ( महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवा निवृत्ती ) नियम १९८२ सेवानिवृत्ती, कुटुंबनिवृत्ती अंशराशीकरण, पेशन केस पेपरसेट, विभागीय चौकशी कार्यपध्दती, वैद्यकीय देयक मंजूरीसाठी टिपणी व आदेशाचा नमुना आदी प्रशासकीय बाबींची माहिती कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश महाळुंगे यांनी दिली. 


महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच सक्रिय असते. ठाणे जिल्ह्यात अध्यक्ष प्रकाश म्हाळुंगे सचिव संदेश म्हस्के उपाध्यक्ष अजय भोंडीवली,कार्याध्यक्ष मनोहर शेजवळ, कोषाध्यक्ष संजय कवडे प्रमुख सल्लागार दिलीप भराडे,तसेच विविध पदावर विवेक पवार, राजेंद्र गायकवाड, समीर राऊत, शुभांगी राऊत, कल्पना तोरवणे, विद्या विचारे, पद्माकर राठोड,नितीन घोडके, सतीश खरे पद्माकर व्यापारी, महेश बागराव, रुपेश पाटील, संतोष सुरोशी आदी कर्मचारी संघटनेत कार्यरत आहेत.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image