कोरोना-लढ्यातील कंत्राटी कर्मचारीवर्गास कायम करा.- सचिन शिंदे, इंटक ठाणे जिल्हा अध्यक्ष

 


ठाणे : कोरोना विरोधातील लढ्यात पोलीस आणि आरोग्य यंत्रणेबरोबरच ठाणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी जीवावर उदार होऊन उतरले आहेत. या कर्मचारीवर्गाला विशेष सेवा प्रोत्साहन भत्ता, कायमस्वरुपी सेवा अशा स्वरुपात बक्षिसी देवून दिलासा द्यावा, अशी मागणी ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे.


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा रेड झोनमध्ये येत आहे. शासन या जिल्ह्याकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. जवळपास सव्वा महिना लाॅकडाऊन  सुरूच आहे. विविध व्यवसाय,आस्थापना पूर्ण बंद आहेत. सर्वत्र विविध स्तरावर लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत, परंतु मागील काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिकेच्या कंत्राटी पद्धतीने काम करणा-या कर्मचारी वर्गाकरिता कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे अथवा ते काम करित असताना त्यांच्या वा त्यांच्या कुटुंबियांचा कुठेही विचार होत नसल्याचे दिसत आहे, असे इन्टकचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी म्हटले आहे.


आजमितीस ठाणे महानगरपालिकेत विविध ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामगार काम करीत आहेत. आरोग्यसेवा, रुग्णसेवा, क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची सुरक्षितता आदी माध्यमातून हे कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा करित आहेत. हे सर्व कर्मचारी आपल्या पुढील भवितव्याचा विचार न करता आलेल्या सकटांवर मात देण्यासाठी कार्यरत असल्याचे श्री.शिंदे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.


अशा प्रसंगी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने किंवा महाराष्ट्र सरकारने या सर्व कर्मचारीवर्गाकरिता त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने एखादा महत्वपूर्ण निर्णय घेतला पाहीजे. त्यांना विशेष सेवा प्रोत्साहन भत्ता दिला पाहिजे, त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळेल असा निर्णय होण्यासाठी सरकारने नवीन धोरण तयार केले पाहिजे, अशी मागणी ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे यांनी  केली आहे.



Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image