ठाणे :- कळवा, खारीगाव विटावा, पारसिक नगर येथे नियमित सराव करणाऱ्या डॉक्टरांच्या अनेक छोट्या छोट्या क्लिनिक्स आहेत.त्यात सर्वसाधारण पणे ENT, दातांचे, हृदयविकार, मधुमेह/ उच्च रक्तदाब, बालरोगतज्ज्ञ,स्त्री रोगतज्ञ,अर्थोपेडिंक सर्जन, अश्या अनेक आजारांवर व रुग्णावर उपचार गेले अनेक वर्षांपासून करत आहेत पण करोना संसर्ग परिस्थिती मुळे सध्या बंद करून बसलेत.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या सर्व डॉक्टरांना आपले दवाखाने करोना बाह्य रुग्णांसाठी खुले करण्याचं आदेश दिले होते तसे न केल्यास त्याचा परवाना रद्द करण्यात येईल असं ही सांगितले होते.पण कळवा विभागातील जवळजवळ सर्वच छोटे दवाखाने करोना चे कारण पुढे करून बंद च ठेवले आहेत .याचा त्रास सर्वसामान्य रुग्णांना होत आहे, ठाणे मनपा कळवा प्रभाग समिती यांच्याकडुन कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्यामुळे डॉक्टरांनी आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे कळवेकरांचे म्हणणं आहे.काही डॉक्टर अगदी एखाद तासासाठी दवाखाना उगडतात व लगेच बंद करू जातात त्यामुळं वयोवृद्ध यांना उपचारासाठी त्वरित येता येत नसल्याने त्यांची मोठी अडचण होते.कळव्यातील मोठी रुग्णालयात जाण्यासाठी करोना मुळे साधारण रुग्ण धजावत नाहीत.अश्या वेळी शासनाचे आदेशानुसार त्वरित छोटे दवाखाने सुरू करावेत व तस न करणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी अशी कळवा विभातील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांनी मागणी केली आहे.
ठाणे कळवा विभागात आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली. बहुसंख्य दवाखाने बंद.करोना बाह्य रुग्णांचे हाल.