कळवा विभागात नगरसेवक मिलिंद पाटील यांची कळवेकारांसाठी दिवस/ रात्र एक.ठाणे :- करोना ही जागतिक महामारीने जगाला वेढले असतांना कोणताही प्रदेश यातून सुटला नाही.त्यात कळवा विभागातील कोरोना संसर्गाच वाढत प्रमाण चिंताजनक आहे. अश्या वेळी शासन व प्रशासन अहोरात्र जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य पार पाडत आहे.गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घेतलेला वसा प्रामाणिक पणे जेष्ठ, सुशिक्षित,माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक मिलिंद पाटील पुढे आपल्या कामाने पुढे नेताना दिसते.कोरोना पाश्वभूमी वर पहिल्या दिवसापासून मिलिंद पाटील बारकाईने लक्ष देऊन आहेत.कुठे रुग्ण आढल्यास रात्र असो वा दिवस कोणत्याही शासकीय यंत्रानेशिवाय पाटील तातडीने पोहचतात.काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचा आढावा घेऊन त्या अंमलात आणतात.नागरिकांचं जीव वाचवण्यासाठी सतत कोणत्या ना माध्यमातून प्रयत्न शील असतात.दुर्दैवाने कोणत्या विभागा कोरोना रुग्ण आढळून आल्यास रुग्णासह विभागातील नागरिकांना अत्यावश्यक वस्तू, औषद, आरोग्यासाठी इतर चाचण्या अश्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देत आहेत, पाटील हे पदवीधर असल्याने कुठे काय करावे हे चांगले माहीत आहेत.कळवा विभाग मिलिंद पाटील हजारो लोकांना व शेकडो इमारतीना अश्या बिकट समई केलेली प्रामाणिक मदत कळवेकरांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील असं एका जेष्ट नागरिकांचं म्हणणं आहे
कळवा विभागात नगरसेवक मिलिंद पाटील यांची कळवेकारांसाठी दिवस/ रात्र एक.