प्रशासनाच्या अंतर्गत बातम्या वृत्तपत्रांना देऊन प्रामाणिक अनिरुद्ध माळगावकर यांच्या बदनामी चा कट - वैद्यकीय अधिकारी संघटना ठामपा.

 


ठाणे :-  मराठी वृत्तपत्र मध्ये कोरोना मोहिमेच्या आधी अवाजवी दराने अनावश्यक वैद्यकीय उपकरणे प्रोटेक्टिव इक्विपमेंट ,सॅनीटायझर ,मास्क यांची अवाजवी दराने खरेदी केली अशी बातमी छापून आली आहे.


सदर खरेदीसाठी खरेदीची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली गेली नाही असा आरोप त्यामध्ये करण्यात आला आहे.
        वास्तविक बातमी विभाग प्रमुख *डॉ.माळगावकर यांचेवर निखालस खोटे आरोप* करण्यासाठी देण्यात आली आहे , हे बातमी वाचूनच समजून येते. कोरोना ची साथ येण्याअगोदरच खरेदी केली असे बातमीत नमूद आहे. अशी खरेदी कोणीही अधिकारी करणार नाही किंबहुना करू शकणार नाही, हे सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेल्या कोणत्याही नागरिकाला समजून येते.
  कोव्हीडची साथ सुरु झाल्यानंतर प्रतिबंधात्मक मोहीम सुरू करताना *उपरोल्लेखित सर्व बाबींची तातडीची निकड असल्यामुळे* सर्व वैद्यकीय अधिकारी व स्टाफ यांचेकडून ,या सर्व बाबी तातडीने मिळाल्या पाहिजेत अन्यथा कामकाज करू शकणार नाही ,अशी मागणी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली होती. आणि सदर मागणी ही रास्तच होती. *त्या परिस्थितीत सदर खरेदी ,मिळेल त्या भावाने करणे, चा निर्णय हा देखील योग्य असाच होता*. कारण त्या कालावधीमध्ये सदर बाबी बाजारात उपलब्धच होत नव्हत्या.
  वास्तविक अशाप्रकारे *प्रशासकीय प्रक्रिया पार न पाडता मंजुरीशिवाय अगोदरच खरेदी करणे, कॉन्ट्रॅक्ट चे पैसे देणे, कंत्राटाच्या कालावधी वाढवणे, इत्यादी प्रकार डॉ. माळगावकर यांचे आधीच्या पंधरा वर्षाच्या कालावधीतच नेहमीच होत आल्याचे आपणास दिसून येईल.* त्यावेळेस मात्र अशा प्रकारची हरकत कोणीही घेतल्याचे ऐकिवात नाही. आणि आता मात्र एक अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे व सचोटीचे विभाग प्रमुख कार्यरत असताना *जाणीवपूर्वक त्यांचेवर चिखलफेक करण्याचे काम काही नतद्रष्ट मंडळी स्वार्थासाठी करीत आहेत*. हे काम प्रशासनातील  अधिकाऱ्यांनीच केलेले आहे हे वेगळे सांगायला नकोच. कारण
अशा बातम्या विभागात फिरून पत्रकारांना मिळत नसतात तर कोणीतरी जाणीवपूर्वक त्यांना चुकीची माहिती पुरवून  बातम्या छापून आणीत असतात.
       आमची आपल्याकडे विनंतीपूर्वक मागणी आहे की , *अशाप्रकारे प्रशासकीय माहिती बाहेर पुरवणाऱ्या अधिकार्यांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी*.
        तसेच  राजदेरकर यांचे स्वाक्षरीने एक आदेश निर्गमित करण्यात आला आहे ज्यानुसार सर्व खरेदी यापुढे प्रशासकीय प्रक्रिया पार पाडूनच करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पत्रकानुसार कार्यवाही करण्याचे झाल्यास कोरोना प्रतिबंधक मोहिमेमध्ये अनंत अडचणी निर्माण होतील, कारण प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यास किमान एक ते दोन महिने चा कालावधी मंजुरीसाठी जात असतो. कोरोना सारख्या मोहिमेमध्ये, *अत्यंत तातडीच्या गरजेच्या परिस्थितीत, सदर खरेदीचे प्रस्ताव हे ,वरिष्ठांची तोंडी मंजुरी घेऊन, नंतर कार्योत्तर मंजुरी घेणे या परिस्थितीत योग्य ठरते.* अन्यथा विभाग प्रमुख कोणीही असला तरी सदर मोहिमेचे कामकाज पार पडणे अशक्य होऊन बसेल.
  आपण सदर परिस्थितीबाबत सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ते आदेश निर्गमित करावे ही नम्र विनंती सर्व सदस्य वैद्यकीय अधिकारी संघटना ठामपा यांनी ठाणे मनपा महापौर यांना केली आहे.


डॉ.अनिरुद्ध माळगावकर हे अतिशय सज्जन व प्रमाणिक असे वैधकीय अधिकारी असून त्यांना काही भ्रष्ट अधिकारी मंडळी नाहक टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असल्याची मनपात चर्चा सुरू आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image