बाहेरिल राज्यातील मजूर व श्रमिक वर्गासाठी इंटक काँग्रेसचे मार्गदर्शन केंद्र.

 


ठाणे :- लाॅकडाउन पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकारने महाराष्ट्रात राहात असलेले व देशातील इतर राज्यांतील मूलनिवासी नागरिकांना त्यांच्या त्यांच्या गावी जाण्यासाठी काही अटीशर्तीची पूर्तता करून परवानगी दिली आहे सद्यस्थितीत या बाबत विविध ठीकाणी प्रकीया सूरू असून अनेक ठीकाणी या नागरिकांना यांची पूर्ण माहिती नसल्याने नागरीक इकडे तिकडे धावपळ करीत आहेत या परिस्थितीत या लोकांचा पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व सर्वतोपरी सहकार्य करावे असे आदेश काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिलेले आहेत याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात ठाणे काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे यांनी जिल्हा मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय,स्टेशन रोड,ठाणे.येथे गुरूवार दिनांक 7 मे पासून सकाळी 11 ते दुपारी 1 व सांयकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत या नागरिकांना मदत करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी मदत केंद्र उभारण्यात आले आहे*
      या मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन ठाणे काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केले याप्रसंगी इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे,जेष्ठ नेते वसंत पोलडीया, शहर काँग्रेस ब्लाॅक अध्यक्ष सदिप शिंदे,शहर काँग्रेस सरचिटणीस शिरीष घरत,अजिंक्य भोईर काँग्रेस प्रवक्ते गिरीष कोळी व युवक काँग्रेसचे विशाल घोलप आदि पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना मनोज शिंदे यांनी सांगितले की या मार्गदर्शन केद्राच्या माध्यमातून नागरिकांना मोफत फाॅर्म देण्यात येतील व फाॅर्म कशा पद्धतीने भरायचा,वैद्यकीय दाखला कसा मिळेल,कोणकोणती कागदपत्रे सोबत जोडायचीत,स्थानिक पदाधिकारी तसेच विविध कागदपत्राकरिता मार्गदर्शन करण्यात येणार आहे, यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सद्यस्थितीत वाजती रूग्नाची संख्या पाहता सजग पणे घेणे गरजेचे आहे अनेक ठीकाणी सदभावनेने विविध जीवनावश्यक वस्तूचे वाटप होत असताना वाटप करणारेच रूग्न होत असल्याचे दिसत आहेत म्हणून विशेष करून या लोकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे असे सागितले,शहरातील विविध भागात अशी अजून मदत केद्रे उघडण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सागितले.


                         


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image