ठाणे :- राज्यात करोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्या जीवाची काळजी न करता दिवसरात्र रस्त्यावर उतरून लढणाऱ्या पोलिसांच्या आरोग्यासाठी ठाण्यातील माऊली युथ फाउंडेशन ने एक चांगले पाऊल उचलले, माऊली यूथ फाउंडेशन ने आपल्या मित्र/ परिवाराला, सर्वाना सहकार्य साठी आवाहन केले होते .अनेकांनी फाउंडेशन ला मदतीचा हात दिला त्यातूनच या तरुण मंडळी नी प्रामाणिक पणे सामाजिक बांधीलकी जपत कळवा पोलीसांना मास्क, सॅनिटायजर च पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी वाटप केले. या पुढे ही आम्ही विविध समाज उपयोगी कार्यकरितच राहू अस मत माऊली युथ फाउंडेशन चे अध्यक्ष गणेश राउत यांनी व्यक्त केले आहे.
माऊली यूथ फाउंडेशन ने केले पोलीसांना मास्क चे वाटप.