श्रीमंत दगदुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे पुरंदरमध्ये 'जलदान'

 


पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने पुरंदर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना दोन टँकर्सद्वारे ‘अमृतजल’ योजनेतून पाणीपुरवठा केला जात आहे.


यंदा टंचाईग्रस्त गावांमधील दुर्गम भागातही पाणीपुरवठा केल्याने अनेक वन्य जीवांची तहान भागली आहे. तसेच वागदरवाडी ग्रामपंचायत, रणनवरेवाडी, मौजे नावळे आदी टंचाईग्रस्त गावांमधील वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील गावांना ऐन उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. टँकर चालकही येथील टंचाईग्रस्त भागांची नेमकी माहिती घेऊन त्या ठिकाणी पाणी पुरवत आहेत.


पुरंदर तालुक्यातील टंचाईग्रस्त पिंगोरी गांवात ट्रस्टच्या वतीने जलसंधारण योजना राबविण्यात आली आणि ते गांव पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्यात आले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंगोरी येथील कामाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले होते.सन २०१३ पासून अमृतजल योजने अंतर्गत ट्रस्टतर्फे दोन टँकर्स तालुक्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात आले आहेत


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image