नवी दिल्ली - करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला देशातील लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.
यासोबत सोमवारपासून लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच देशाला संबोधित करताना लॉकडाउन वाढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र यावेळी त्यांनी त्यासंबंधी सविस्तर माहिती दिली नव्हती.
१७ मे रोजी यासंबंधी माहिती दिली जाईल असं त्यांनी सांगितलं होतं.
त्यानुसार आज घोषणा करण्यात आली असून देशात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.