ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना, वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर,

 


नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा.
ठाणे : पोलिस, डॅाक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबतच आता वस्त्या-वस्त्यांमध्ये कोव्हीड योद्धे गस्तीवर असून त्याचा सोशल डिस्टन्सींग आणि कॅान्टॅक्ट ट्रेसिंगसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या संकल्पनेतून कोव्हीड योद्ध्यांची योजना प्रत्यक्षात राबविण्यात येत असून सर्व स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक प्रभागामध्ये कोव्हीड योद्धे कार्यरत आहेत. सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे गस्तीवर आहेत.


सुरूवातीच्या काळात ज्या ठिकाणी कोरोना कोव्हीड 19 चा जास्त प्रादूर्भाव आहे त्याच परिसरात हे कोव्हीड योद्धे कार्यरत होते. स्थानिक नगरसेवकांच्या साहाय्याने त्याच परिसरातील युवा कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून त्यांना कोव्हीड योद्धे म्हणून काम करण्यास प्रवृत्त केले होते. परंतू आता प्रत्येक प्रभागामध्ये स्थानिक नगरसेवकांच्या साहाय्याने किमान 10 कोव्हीड योद्धे नेमण्यात येत आहेत. बहुतांशी ठिकाणी हे कोव्हीड योद्धे कार्यरत असून उर्वरित ठिकाणीही हे कोव्हीड योद्धे नेमण्याबाबत महापालिका आयुक्तांनी सर्व परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना सूचित केले आहे.


अशा पद्धतीने संपूर्ण शहरामध्ये सद्यस्थितीत 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे कार्यरत असून येत्या काही दिवसांमध्ये ही संख्या 1300 पर्यंत नेण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.सदर कोव्हीड योद्ध्यांना महापालिकेच्यावतीने महापालिकेचे बोद्धचिन्ह असलेले जॅकेट देण्यात आलेले आहे. हे सर्व योद्धे स्थानिक कार्यकर्ते असून त्यांना त्या परिसरातील संपूर्ण माहिती असल्याने परिसरात कोणाला कोव्हीडची लक्षणे आहेत का याची माहिती तात्काळ मिळण्यास तसेच सोशल डिस्टन्सींग पाळण्यास मोठी मदत होत आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image