ठाणे :- होरायझन प्राईम हाॅस्पीटलपाठोपाठ आता सफायर आणि वेदांत हाॅस्पीटलमध्येही ठाणे महापालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 बाधित गरीब गरजू नागरिकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुविधा आज पासून सुरू करण्यात आली आहे.
शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना कोव्हीड - १९ घोषित केलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार मिळावेत यासाठी महापालिका प्रशासन आग्रही होते याच पार्श्वभूमीवर पिवळे केशरी रेशनकार्डधारक व मध्यम उत्पन्न गटातील नागरीकांना हॉरिजॉन प्राईम हॉस्पिटलमध्ये या आधी मोफत उपचार सुविधा सुरू करण्यात आले असून आता सफायर कळवा आणि वेदांत हॅास्पीटल कासार वडवली ठाणे येथे ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या रुग्णालयात गरजू व वंचितांना मोफत
कोविड -१९ उपचार मोफत दिले जाणार आहेत. शहरातील कोव्हीड बाधित गरीब नागरिकांना सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत दाखल केले जाणार आहे. या योजनेंतर्गत उच्च प्रतीचे उपचार, अत्याधुनिक सुविधा व पौष्टिक जेवण सर्व रूग्णांना विनामूल्य उपलब्ध देण्यात येणार आहे. या योजनेसाठी नि:शुल्क हेल्पलाईन नंबर 14555 / 1800111565 - महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, 155388 / 18002332200 - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अधिक माहितीसाठी ०२२ - २५३३३२२२या क्रमांकावर तर वेदांत हाॅस्पीटलसाठी ०२२-२५९८८०००/०३, ९८९२५०७७०० या संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
होरायझन पाठोपाठ आता सफायर आणि वेदांत हॅास्पीटल मध्येही गरिबांसाठी कोविड -19वर मोफत उपचार सुरू.ठामपा डॅशिंग आयुक्त विजय सिंघल यांचे आदेश.