राज्यात नवीन 1089 रुग्ण,कोरोनाबाधितांची संख्या 19,063 तर 3,470 रुग्ण कोरोनामुक्त.

 


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 19 हजार 63 झाली आहे. आज 1,089 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 169 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3,470 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (शुक्रवारी) दिली.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 12 हजार 350 नमुन्यांपैकी 1 लाख 92 हजार 197 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटीव्ह तर 19 हजार 63 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 39 हजार 531 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 494 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


आज राज्यात 37 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 731 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 25, पुण्यातील 10, जळगाव जिल्ह्यात 1 तर अमरावती शहरात 1 मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 19 पुरुष तर 18 महिला आहेत. आज झालेल्या 37 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 17 रुग्ण आहेत तर 16 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहेत. 37 रुग्णांपैकी 27 जणांमध्ये (73 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)


*मुंबई महानगरपालिका: 12,142 (462)*
ठाणे: 101 (2)
ठाणे मनपा: 724(8)
नवी मुंबई मनपा: 716 (4)
कल्याण डोंबिवली मनपा: 284 (3)
उल्हासनगर मनपा: 15
भिवंडी निजामपूर मनपा: 21 (2)
मीरा भाईंदर मनपा: 192 (2)
पालघर: 46 (2)
वसई विरार मनपा: 194 (9)
रायगड: 81 (2)
पनवेल मनपा: 132 (2)
*ठाणे मंडळ एकूण: 14,648 (497)*
नाशिक: 47
नाशिक मनपा: 60
मालेगाव मनपा:  450 (12)
अहमदनगर: 44 (2)
अहमदनगर मनपा: 09
धुळे: 8 (2)
धुळे मनपा: 24 (1)
जळगाव: 82 (12)
जळगाव मनपा: 14(2)
नंदूरबार: 19 (1)
*नाशिक मंडळ एकूण: 757 (32)*
पुणे: 110 (4)
पुणे मनपा: 1938 (132)
पिंपरी चिंचवड मनपा: 129 (3)
सोलापूर: 6
सोलापूर मनपा: 179 (10)
सातारा: 94 (2)
*पुणे मंडळ एकूण: 2456 (151)*
कोल्हापूर: 10 (1)
कोल्हापूर मनपा: 6
सांगली: 32
सांगली मिरज कुपवाड मनपा: 3 (1)
सिंधुदुर्ग: 5
रत्नागिरी: 17 (1)
*कोल्हापूर मंडळ एकूण: 73 (3)*
औरंगाबाद: 5
औरंगाबाद मनपा: 418 (12)
जालना: 12
हिंगोली: 58
परभणी: 1 (1)
परभणी मनपा: 1
*औरंगाबाद मंडळ एकूण: 495* (13)
लातूर: 25 (1)
लातूर मनपा: 0
उस्मानाबाद: 3
बीड: 1
नांदेड: 3
नांदेड मनपा: 29 (2)
*लातूर मंडळ एकूण: 61 (3)*
अकोला: 9 (1)
अकोला मनपा: 112 (9)
अमरावती: 4 (1)
अमरावती मनपा: 76 (10)
यवतमाळ: 95
बुलढाणा: 24 (1)
वाशिम: 1
*अकोला मंडळ एकूण: 321* (22)
नागपूर: 2
नागपूर मनपा: 210 (2)
वर्धा: 0
भंडारा: 1
गोंदिया: 1
चंद्रपूर: 1
चंद्रपूर मनपा: 3
गडचिरोली: 0


*नागपूर मंडळ एकूण: 218 (2)*


*इतर राज्ये: 34 (8)*


एकूण:  19 हजार 63 (731)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1,139 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 13 हजार 552 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 52.64 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image